पळून गेलेली सासू, होणाऱ्या जावयापेक्षा ११ वर्षांनीच मोठी; पत्नी भेटली तर पती तिला हा प्रश्न विचारणार...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 14:29 IST2025-04-11T14:28:47+5:302025-04-11T14:29:24+5:30
जावई राहुल याचे सासू अनिता हिच्या मुलीशी १६ एप्रिलला लग्न होते. लग्नाच्या १० दिवस आधी सासूनेच जावयासोबत लग्न उरकले आहे.

पळून गेलेली सासू, होणाऱ्या जावयापेक्षा ११ वर्षांनीच मोठी; पत्नी भेटली तर पती तिला हा प्रश्न विचारणार...
अलीगढमधील होणारा जावई आणि सासूची लव्हस्टोरी देशभर गाजत आहे. जावई राहुल याचे सासू अनिता हिच्या मुलीशी १६ एप्रिलला लग्न होते. लग्नाच्या १० दिवस आधी सासूनेच जावयासोबत लग्न उरकले आहे. आता जावयाने सासऱ्याला निरोप पाठवून तुझ्या बायकोला विसरून जा, असे सांगितले आहे. सासू-सासऱ्याच्या लग्नाला वीस वर्षे झाली आहेत. मुलगी लग्नाची आहे, मग जावयाचे आणि सासूचे वय किती, असा सवाल उपस्थित होत होता.
दोघांच्या या विश्वासघातकी लव्हस्टोरी व लग्नाच्या नात्यावर लोक प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. ज्याच्याशी सासून लग्न केले आहे, तो न झालेला जावई अन् आताचा पती तिच्यापेक्षा ११ वर्षांनी लहान आहे. म्हणजेच राहुल हा नवरीपेक्षा जवळपास १० ते ११ वर्षांनी मोठा होता.
आता या प्रसंगानंतर मुलीकडचे नातेवाईक राहुलच्या घरी गेले आहेत. त्याचा शोधही घेत आहेत. राहुल हा कपडे विक्री करायचा. मुलीच्या नातेवाईकांनी त्याच्या घरी जात आतापर्यंतचा जो काही खर्च झाला आहे तो परत मागितला आहे. या कुटुंबासोबत आता आम्हाला कोणतेही नाते ठेवायचे नाही, असे त्यांनी सांगितले आहे. तर पती जितेंद्र पत्नीच्या विरहात आहे. ती जेव्हा परत येईल, भेटेल तेव्हा मी तिला तिने असे का केले असे विचारणार आहे, असे त्याने म्हटले आहे.
आपल्या होणाऱ्या नवऱ्यासोबत आपल्या आईला बघून मुलीने संताप व्यक्त केला आहे. शिवानीच्या लग्नाला ९ दिवस असतानाच ते पळून गेले होते. आईने काहीतरी काम आहे असे सांगितले होते, व बाहेर गेली होती. ती परत आलीच नाही. पतीने विचारपूस सुरु केली तेव्हा समजले की होणारा जावई देखील घरातून गायब झाला आहे. मग जे पुढे आले त्यातून दोन्ही कुटुंबे हादरली होती. आता त्यांचा एकत्र फोटो तो देखील सासूची गुलाबी साडी आणि तिच्या गळ्यात मंगळसूत्र व डोक्यात सिंदूर पाहून सर्वांना धक्का बसला आहे.