शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अखेर राहुल-अखिलेश एकत्र येणार; युपीत काँग्रेसला 17 जागा देण्यास समाजवादी पार्टीचा होकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2024 16:11 IST

अनेक चढ-उतारानंतर उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी आणि काँग्रेसने एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

Loksabha Election 2024: अनेक चढ-उतारानंतर उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी आणि काँग्रेसने एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सपा आणि काँग्रेसमध्ये चर्चा झाली असून, आघाडीच्या फॉर्म्युल्यावर दोन्ही पक्षांचे जवळपास एकमत झाले आहे. रिपोर्टनुसार, काँग्रेस युपीत 17 जागांवर निवडणूक लढवणार आहे. आज संध्याकाळपर्यंत जागावाटपाची अधिकृत घोषणा केली जाईल. 

मीडिया रिपोर्ट्समध्ये सूत्रांच्या हवाल्याने सांगण्यात येत आहे की, या 17 जागांपैकी काँग्रेसने दोन जागांवर बदल करण्याची मागणी केली आहे. काँग्रेसने बुलंदशहर आणि हाथरसऐवजी सीतापूर आणि श्रावस्तीच्या जागा मागितल्या आहेत. अखिलेश यादव यांनीही हा प्रस्ताव मान्य केल्याचे बोलले जात असून आज सायंकाळपर्यंत अधिकृत घोषणा होऊ शकते.

काँग्रेस या 17 जागांवर निवडणूक लढवणार उत्तर प्रदेशमध्ये INDIA आघाडीत काँग्रेसला 17 जागा मिळाल्या आहेत. रायबरेली, अमेठी, कानपूर, फतेहपूर सिक्री, बांसगाव, सहारनपूर, प्रयागराज, महाराजगंज, वाराणसी, अमरोहा, झाशी, बुलंदशहर, गाझियाबाद, मथुरा, सीतापूर, बाराबंकी आणि देवरिया मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार निवडणूक लढवतील. यात एक किंवा दोन जागांवर बदल होऊ शकतो.

सर्व काही ठीक आहे-अखिलेश यादव गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस आणि सपामध्ये जागावाटपावरुन वाद सुरू होता. आता अखेर आघाडी होणे जवळपास निश्चित झाले आहे. याबाबत मीडियाशी बोलताना समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव म्हणाले, “शेवट चांगला तर सगळंच चांगल. होय, आघाडी होणारच, यात काहीच वाद नाही. काही तासांत सर्व काही स्पष्ट होईल.” यासंदर्भात दोन्ही पक्षांकडून संयुक्त पत्रकार परिषदही घेतली जाऊ शकते.

सपाने 31 उमेदवारांची घोषणा केली विशेष म्हणजे, आघाडी होण्यापूर्वीच समाजवादी पार्टीने आतापर्यंत 31 उमेदवारांची घोषणा केली आहे. सपाने संभल, बदाऊन, फिरोजाबाद, मैनपुरी, एटा, खेरी, धौराहारा, उन्नाव, लखनौ, फारुखाबाद, अकबरपूर, बांदा, फैजाबाद, आंबेडकरनगर, बस्ती, गोरखपूर, कैराना, बरेली, हमीरपूर, वाराणसी, मुजफ्फरनगर, शहापूर, हरदो, अमला, बरैली, मिसरिख, मोहनलालगंज, प्रतापगड, बहराइच, गोंडा, गाझीपूर आणि चंदौली जागांसाठी उमेदवार घोषित केले आहेत.

टॅग्स :lok sabhaलोकसभाElectionनिवडणूकUttar Pradeshउत्तर प्रदेशRahul Gandhiराहुल गांधीAkhilesh Yadavअखिलेश यादवcongressकाँग्रेसSamajwadi Partyसमाजवादी पार्टी