UP Election: 'यूपीत आम्ही 304 जागा जिंकलो', अखिलेश यादव यांचा अजब दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2022 01:25 PM2022-03-15T13:25:48+5:302022-03-15T13:25:54+5:30

UP Election Result: समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव म्हणाले की, पोस्टल बॅलेटमध्ये सपा-आघाडीला 51.5% मते मिली, त्यानुसार आम्ही 304 जागा जिंकल्या.

UP Election | Akhilesh Yadav | 'We have won 304 seats in UP', Akhilesh Yadav on postal ballet vote | UP Election: 'यूपीत आम्ही 304 जागा जिंकलो', अखिलेश यादव यांचा अजब दावा

UP Election: 'यूपीत आम्ही 304 जागा जिंकलो', अखिलेश यादव यांचा अजब दावा

Next

लखनौ: नुकताच पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल हाती आला. यात उत्तर प्रदेशमध्ये भाजपने सत्ता राखली, तर समाजवादी पक्षाच्या आघाडीला 125 जागा मिळाल्या. पण मंगळवारी सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी पोस्टल बॅलेटचा मुद्दा उपस्थित करुन सपा-आघाडीला 51.5% मते मिळाल्याचे म्हटले आहे. तसेच, त्यानुसार सपा आघाडीला 304 जागा मिळाल्या, असा दावाही केला आहे.

अखिलेश यादव यांनी मंगळवारी पोस्टल बॅलेटचा मुद्दा उपस्थित केला. मी पोस्टल बॅलेट निवडणुकीचे सत्य सांगत असल्याचे ते म्हणाले. पोस्टल मतदान करणाऱ्या प्रत्येक सच्चा सरकारी कर्मचारी, शिक्षक आणि मतदारांचे आभार मानतो, ज्यांनी आम्हाला प्रामाणिकपणे मतदान केले, असेही ते म्हणाले.

सपाने जारी केला आदेश
दुसरीकडे, उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत 111 जागा जिंकून दुसऱ्या क्रमांकावर आलेल्या समाजवादी पक्षाने कार्यकर्त्यांना भाजपच्या आयटी सेलकडून सतर्क राहण्यास सांगितले आहे. यासोबतच कोणत्याही प्रकारची सूचना असल्यास थेट पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांच्याशी संपर्क साधण्यास सांगण्यात आले आहे. यासाठी अखिलेश यांचा ईमेल आयडी जारी करण्यात आला आहे.

कोणाला किती जागा मिळाल्या

यूपी विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष (BJP) दुसऱ्यांदा जबरदस्त बहुमत मिळवून सत्तेत परतला आहे. भाजप आघाडीला 273 जागा मिळाल्या आहेत. समाजवादी पक्षाच्या (SP) नेतृत्वाखालील आघाडीला 125 जागा मिळाल्या आहेत. बसपा 1, काँग्रेस आणि जनसत्ता दलाच्या उमेदवारांनी प्रत्येकी 2 जागा जिंकल्या आहेत. 2017 मध्ये समाजवादी पक्षाने 52 जागा जिंकल्या होत्या.

Web Title: UP Election | Akhilesh Yadav | 'We have won 304 seats in UP', Akhilesh Yadav on postal ballet vote

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.