UP Election 2022: यूपीत काँग्रेसला मोठा धक्का! “मैं लडकी हूँ, लड सकती हूँ...” मोहिमेच्या पोस्टर गर्लचा भाजप प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2022 01:26 PM2022-01-20T13:26:19+5:302022-01-20T13:27:11+5:30

UP Election 2022: काँग्रेस महिला हक्कांच्या गोष्टी करते पण आमच्याकडे दुर्लक्ष करते. पक्षाची मोहीम फसवी असल्याचे आरोप करण्यात आला आहे.

up election 2022 congress leader and ladki hoon lad sakti hoon fame priyanka maurya join bjp | UP Election 2022: यूपीत काँग्रेसला मोठा धक्का! “मैं लडकी हूँ, लड सकती हूँ...” मोहिमेच्या पोस्टर गर्लचा भाजप प्रवेश

UP Election 2022: यूपीत काँग्रेसला मोठा धक्का! “मैं लडकी हूँ, लड सकती हूँ...” मोहिमेच्या पोस्टर गर्लचा भाजप प्रवेश

Next

लखनऊ: उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर (UP Election 2022) पक्षांतर करणाऱ्यांची संख्या वाढताना पाहायला मिळत आहे. अनेक आमदार भाजपला सोडचिठ्ठी देत आहेत, तर काही नेते भाजपमध्ये प्रवेश करताना दिसत आहेत. यातच आता काँग्रेसला विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा धक्का लागण्याची शक्यता आहे. कारण, काँग्रेसने सुरू केलेल्या “मै लडकी हूं, लड सकती हूं...” कॅम्पनेचा चेहरा मानल्या गेलेल्या नेत्या पक्षाला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे. काँग्रेसने संभाव्य उमेदवारांची पहिली यादी जारी केल्यानंतर पक्षातील सदस्यांमध्ये नाराजीचे वारे वाहू लागले आहेत.

रामपूरमध्ये काँग्रेस उमेदवाराने पक्ष सोडून सपाचे सदस्यत्व पत्करले. तर प्रियंका गांधींनी ४० टक्के महिलांना तिकिट देण्यासाठी राज्यात सुरु केलेल्या मोहिमेचा चेहरा प्रियंका मौर्य भाजपमध्ये प्रवेश करू शकतात, अशीही चर्चा आहे. प्रियंका मौर्य भाजपच्या कार्यालयात गेल्या होत्या. त्यानंतर त्या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. 

काँग्रेसतर्फे ‘मै लडकी हूं, लड सकती हूँ’ अशी मोहीम

काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेशातील ४० टक्के महिला उमेदवारांना तिकिट देण्याची घोषणा केली होती. त्यासाठी काँग्रेसतर्फे राज्यात ‘मै लडकी हूँ, लड सकती हूँ’ अशी मोहीमही सुरु करण्यात आली. या मोहिमेच्या पोस्टर्सवरील काँग्रेस कार्यकर्त्या प्रियंका मौर्य असून, या चळवळीसोबत त्या जोडली गेल्या आहेत. मागील काही दिवसांपासून प्रियंका मौर्य चर्चेत आल्या होत्या. 

प्रियंका गांधी आणि काँग्रेस नेतृत्वावर नाराज 

प्रियंका गांधी यांचे खासगी सचिव संदीप सिंह यांच्यावर प्रियंका मौर्य यांनी तिकिट विकल्याचा आरोप केला होता. प्रियंका मौर्य यांना लखनौमधील सरोजनी नगर येथून तिकिट हवे होते. मात्र, पक्षाने त्यांना या जागेसाठीचे तिकिट दिले नाही. त्यामुळे प्रियंका मौर्य प्रियंका गांधी आणि काँग्रेस नेतृत्वावर नाराज आहेत. तसेच मी माझ्या विभानसभा मतदारसंघात खूप मेहनत घेतली होती. मात्र पक्षाने तेथून मला तिकिट दिले नाही. काँग्रेस महिलांच्या हक्काच्या चर्चा करते, पण इथे आमच्या हक्कांकडे सर्रास दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे काँग्रेसची ही मोहीमच फसवी आहे, असा आरोप प्रियंका मौर्य यांनी केला आहे.
 

Web Title: up election 2022 congress leader and ladki hoon lad sakti hoon fame priyanka maurya join bjp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app