शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली कॅपिटल्स जिंकले, राजस्थान रॉयल्सचे प्ले ऑफचे तिकीट पक्के झाले! गणित बिघडले
2
Rakhi Sawant : राखी सावंतची प्रकृती बिघडली, रुग्णालयातील फोटो व्हायरल, नेमकं काय झालंय?
3
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल
4
छत्रपतींचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना मराठी माणूस धडा शिकवेल; काँग्रेसची घणाघाती टीका
5
PM Modi Property in Affidavit, Lok Sabha Election 2024: वाराणसीतून पंतप्रधान मोदी यांनी भरला उमेदवारी अर्ज... पाहा त्यांची प्रॉपर्टी किती? शिक्षण किती?
6
इस्रायलच्या अडचणी वाढणार? आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार सुनावणी
7
पेटीएमवर UPI Lite Wallet कसे अ‍ॅक्टिव्हेट करायचे? जाणून घ्या प्रोसेस...
8
"गेल्या १० वर्षात देशाची प्रगती, आता भारताला कुणीच..."; रश्मिका मंदानानं केलं मुंबईच्या 'अटल सेतू'चं कौतुक!
9
KL Rahul चा अफलातून झेल पाहून संजीव गोएंका खूश झाले; टाळ्या वाजवताना दिसले, Video
10
Kangana Ranaut : 7 किलो सोनं, 60 किलो चांदी, 50 LIC पॉलिसी...; कोट्यवधींची मालकीण आहे कंगना राणौत
11
राहुल द्रविडनंतर BCCI मुख्य प्रशिक्षक म्हणून CSK च्या ताफ्यातील प्रमुख व्यक्तीचा करतेय विचार 
12
घाटकोपर होर्डिंगप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अंबादास दानवेंची मागणी
13
34 हजार कोटींचा बँक घोटाळा; DHFL चा माजी संचालक धीरज वाधवानला CBI ने घेतले ताब्यात
14
अजितदादा आणखी ५-६ दिवस थांबले असते तर शरद पवार 'तो' निर्णय घेणार होते; पाटलांचा खुलासा
15
VIP चोराची अजब कहाणी! वर्षभरात 200वेळा विमानप्रवास; फ्लाईटमधून कोट्यवधींचे दागिने लंपास
16
'कल्याणमध्ये ठाकरेसेना-शिंदेंसेनेची नुरा कुस्ती, निवडणुकीनंतर मोदी आणि ठाकरे एकत्र येतील', प्रकाश आंबेडकर यांचा दावा
17
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
18
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
19
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
20
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."

UP Assembly Election Results: "अखिलेशच होणार मुख्यमंत्री..."; भाजपचा विजय स्वीकारण्यास सपाचा नकार, केला गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2022 5:14 PM

उत्तर प्रदेश निवडणूक निकालासंदर्भात आणि भाजपच्या वतीने केल्या जात असलेल्या जल्लोषासंदर्भात विचारले असता, सपाचे प्रदेशाध्यक्ष नरेश उत्तम पटेल म्हणाले...

लखनौ - उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक निकालाच्या ताज्या आकडेवारीनुसार, भाजपने जवळपास 270 जागांवर आघाडी मिळवली आहे. यातच, भाजप आपल्या विजयाच्या अफवा पसरवत आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर, राज्यात सपाचेच सरकार स्थापन होईल, असा दावा समाजवादी पक्षाने केला आहे.

'सपा उमेदवारांचा विजय घोषित केला जात नाहीय' -उत्तर प्रदेश निवडणूक निकालासंदर्भात आणि भाजपच्या वतीने केल्या जात असलेल्या जल्लोषासंदर्भात विचारले असता, सपाचे प्रदेशाध्यक्ष नरेश उत्तम पटेल म्हणाले, 'आतापर्यंत केवळ 50 टक्केच मतमोजणी झाली आहे आणि भाजप विजयाचा जल्लोष करत अफवा पसरवत आहे," एवढेच नाही, तर अफवा पसरवता यावी म्हणून, निवडणूक आरोयगाच्या वेबसाइटवर सपाच्या उमेदवारांचा विजय घोषित केला जात नाही, असा आरोपही त्यांनी केला आहे.

सपा कार्यकर्त्यांना आवाहन - सपा कार्यकर्त्यांना आवाहन करत पटेल म्हणाले, "कार्यकर्त्यांनी खचून न जाता मतमोजणी केंद्रावर शेवटपर्यंत थांबावे. अंतिम निकाल जाहीर झाला, की सपाच विजयी होईल आणि अखिलेश यादव हेच मुख्यमंत्री होतील."

निकालात भाजपला बहुमत -निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निकालानुसार, आतापर्यंत राज्यातील 403 विधानसभा जागांपैकी भाजप 246 वर जागांवर पुढे आहे. तर समाजवादी पक्ष आणि त्याच्या सहकारी पक्षांनी एकूण 134 जागांवर आघाडी मिळवलेली आहे. निकालांत स्पष्ट बहुमताच्या दिशेने वाटचाल करत असलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी पक्षाच्या मुख्यालयात आनंद साजरा करायलाही सुरुवात केली आहे.

टॅग्स :Uttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२Akhilesh Yadavअखिलेश यादवBJPभाजपाSamajwadi Partyसमाजवादी पार्टी