शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
2
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
3
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
4
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
5
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
6
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
7
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
8
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
9
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
10
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
11
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
12
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
13
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
14
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
15
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
16
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा
17
'सैयारा'साठी 'या' रिअल लाईफ जोडीला होती ऑफर, मोहित सूरींनी बदलला निर्णय; कारण...
18
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
19
"तुझे ओठ सेक्सी आहेत, किस करू?", असित मोदींवर TMKOC फेम अभिनेत्रीचे गंभीर आरोप
20
"तो मला टॉर्चर करतोय"; पत्नीच्या पोलीस तक्रारीनंतर पती घरातून पळाला, पण त्यानंतर जे घडलं...

UP Assembly Election 2022 Result: भाजपला मिळाली सूमारे 4 कोटी मते, तर काँग्रेसच्या खात्यात फक्त 21 लाख

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2022 09:15 IST

UP Assembly Election 2022 Result: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत 37 वर्षात प्रथमच राज्याचे नेतृत्व पुन्हा सत्ताधारी पक्षाकडे आले आहे. भाजपने प्रचंड बहुमताने विजय मिळवला, पण योगी सरकारमधील उपमुख्यमंत्र्यांसह 11 मंत्र्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

कानपूर: काल(10मार्च) 5 राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती आले. भारतीय जनता पक्षाला उत्तर प्रदेशसह 4 राज्यांमध्ये आपली सत्ता राखण्यात यश आले. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये भाजपने दोन रेकॉर्ड बनवले. उत्तराखंडमध्ये दर पाच वर्षांनी सत्तांतर होण्याला भाजपने ब्रेक लावला आणि सगल दुसऱ्यांदा सत्ता काबीज केली. तर तिकडे उत्तर प्रदेशात पहिल्यांदाच एका पक्षाने पूर्ण बहुमताने सत्तेत पुनरागमन केले. 

पहिल्यांदाच उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक (UP Assembly Election 2022 Result) लढवणारे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ(CM Yogi Adityanath) मोठ्या फरकाने विजयी झाले, पण राज्याच्या दोन उपमुख्यमंत्र्यांपैकी एक असलेल्या केशव प्रसाद मौर्य यांना सिरथू विधानसभा मतदारसंघातून पराभचा धक्का बसला. याशिवाय, योगी सरकारमधील मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांनाही पराभवाची धुळ चाखावी लागली. तिकडे, सपाचे सुप्रीमो अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनीही आपल्या पहिल्याच निवडणुकीत मोठा विजय मिळवला. 

भाजपला सूमारे 4 कोटी, काँग्रेसला 21 लाख मतेदरम्यान, दुसऱ्यांदा सत्तेत आलेल्या भाजपला मतदारांनी प्रचंड मत दिल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, निवडणुकीत भाजपला 41.3 टक्के (3.80 कोटी मते) तर समाजवादी पक्षाला 32.1 टक्के म्हणजे(2.95 कोटी मते) मिळाली. या निवडणुकीत काँग्रेसची दयनीय अवस्था झालेली पाहायला मिळाली. उत्तर प्रदेशच्या मतदारांनी सपशेल नाकारलेल्या काँग्रेसला अवघे 21.51 लाख मते मिळाली. तसेच, 403 जागा असलेल्या उत्तर प्रदेश निवडणुकीत काँग्रेसला फक्त 2 जागा जिंकता आल्या.

उपमुख्यमंत्र्यासह 11 मंत्री पराभूत उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. 37 वर्षात प्रथमच उत्तर प्रदेशच्या जनतेने पुन्हा राज्याचे नेतृत्व सत्ताधारी पक्षाकडे सोपवले आहे. भाजपने बहुमताचा आकडा पार केला, पण मागच्या निवडणुकीपेक्षा यंदा कमी जागा जिंकता आल्या. योगी सरकारमधील 11 मंत्र्यांना निवडणुकीत दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. पराभूत झालेल्यांमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि ऊस मंत्री सुरेख राणा यांसारख्या दिग्गजांचाही समावेश आहे.

निषाद पक्षाला 6 जागा मिळाल्यानिर्बल भारतीय शोषित हमारा आम दल (निषाद पार्टी) हा उत्तर प्रदेश निवडणुकीत मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे. भाजपसोबत युती असलेल्या या पक्षाने 6 जागा जिंकल्या आहेत. निवडणुकीत भाजपसह पक्षाने 16 जागांवर उमेदवार उभे केले होते. त्यापैकी 11 जिंकल्या आहेत. पक्षाने 10 जागांवर आपल्या चिन्हावर उमेदवार उभे केले होते, तर 6 जागांवर भाजपच्या चिन्हावर पक्षाचे उमेदवार उतरले होते.

टॅग्स :Uttar Pradesh Assembly Election Results 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक निकाल २०२२yogi adityanathयोगी आदित्यनाथAkhilesh Yadavअखिलेश यादवBJPभाजपाcongressकाँग्रेसSamajwadi Partyसमाजवादी पार्टी