शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

Unnao rape case : सेनगरने त्या महिलेवर केला होता बलात्कार, सीबीआयने दिला पीडितेच्या आरोपांस दुजोरा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2018 7:42 AM

उन्नाव बलात्कार प्रकरणाचा तपास करत असलेल्या सीबीआयने भाजपा आमदार कुलदीप सिंह सेनगर याने पीडित महिलेवर बलात्कार केला होता, असे सांगत त्याच्यावर करण्यात आलेला बलात्काराचा आरोप योग्य असल्याचे म्हटले आहे.

लखनौ -उन्नाव बलात्कार प्रकरणाचा तपास करत असलेल्या सीबीआयने भाजपा आमदार कुलदीप सिंह सेनगर याने पीडित महिलेवर बलात्कार केला होता, असे सांगत त्याच्यावर करण्यात आलेला बलात्काराचा आरोप योग्य असल्याचे म्हटले आहे. सीबीआयने दिलेल्या या माहितीमुळे आरोपी सेनगरच्या अडचणीत वाढ झाली आहे. तसेच या प्रकरणामध्ये पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासात चालढकल करून आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केल्याचेही सीबीआयने म्हटले आहे. उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडितेने  बांगरमऊ येथून भाजपा आमदार असलेल्या कुलदीप सिंह सेनगर याने गतवर्षी 4 जून रोजी आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला होता. यादरम्यान सेनगरची महिला सहकारी दाराबाहेर पाहारा देत होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित तरुणी सेनगरवर आरोप करत राहिली. मात्र स्थानिक पोलिसांनी 20 जून रोजी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये सेनगर आणि अन्य आरोपींची नावे दाखल केली नाहीत.  दरम्यान, सीबीआयने सीआरपीसी कलम 164 अन्वये न्यायालयासमोर पीडितेचा जबाब नोंदवून घेतला आहे. या जबाबामध्येही पीडिता आपल्या आधीच्या जबाबावर ठाम राहिली. पोलिसांची पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात उशीर केला, तसेच तिचे कपडे फॉरेंन्सिक लॅबमध्ये पाठवले नाहीत. हे सर्व जाणूनबुजून आणि आरोपींसोबत संगनमत करून करण्यात आले, असा आरोप सीबीआयच्या एका अधिकाऱ्याने केला. सीबीआयने एप्रिल महिन्यामध्ये आरोपी सेनगर, शशी सिंह आणि अन्य आरोपींना अटक केली होती. या प्रकरणात उत्तर प्रदेश सरकारच्या भूमिकेवरही चौफेर टीका झाली होती. त्यानंतर सरकारने या प्रकरणाचा तपाय सीबीआयकडे वर्ग केला होता.  

आ. सेनगर व त्याच्या भावाने जून २०१७मध्ये आपल्यावर बलात्कार केल्याचा पीडित तरुणीचा आरोप आहे. तपास योग्य पद्धतीने होत नसल्याबद्दल तिने ८ एप्रिल रोजी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यानंतर आरोपींना अटक करण्याऐवजी पोलिसांनी त्या मुलीचे वडील पप्पू सिंग यांना अटक केली. दुस-या दिवशी वडिलांचा पोलीस कोठडीतच मृत्यू झाला. सिंग यांना पोलीस कोठडीमध्ये आमदारांच्या चार साथीदार आणि पोलिसांनी बेदम मारहाण केल्यानेच त्यांचा मृत्यू झाला. पोस्टमॉर्टेम अहवालात त्यांना झालेल्या मारहाणीचा उल्लेख होता. तसेच त्यांनीही मृत्यूआधी आपणास कोणी मारहाण केली, हे सांगितले होते. 

टॅग्स :Unnao rape caseउन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणKuldeep Singh Sengarकुलदीप सिंह सेनगरCBIगुन्हा अन्वेषण विभागCrimeगुन्हा