शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणी भाजपा आमदार सेनगर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2018 09:26 IST

उन्नावमधील युवतीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी भाजपा आमदार कुलदीप सिंह सेनगर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लखनौ - उन्नावमधील युवतीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी भाजपा आमदार कुलदीप सिंह सेनगर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणात आरोप झालेले भाजपा आमदार कुलदीप सिंह सेनगर बुधवारी रात्री एसएसपींच्या निवासस्थानावरून आत्मसमर्पण न करताच माघारी परतले होते.  

या सामूहिक बलात्कार प्रकरणात कुलदीप सिंह सेनगर यांच्याविरोधात भादंवि कलम 363, 366, 376 आणि 506 तसेच पॉस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता सेनगर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.  उन्नाव येथील युवतीवर झालेला बलात्कार आणि तिच्या वडिलांचा पोलीस कोठडीत झालेल्या मृत्यूप्रकरणी आरोप झालेले भाजपा आमदार कुलदीप सिंह सेंगर बुधवारी रात्री आत्मसमर्पण करणास असल्याचे वृत्त आले होते. मात्र प्रत्यक्षात ते आत्मसमर्पण न करताच ते एसएसपींच्या निवासस्थानातून माघारी परतले. मात्र एसएसपी हे उपस्थित नसल्याने आपण माघारी जात असल्याचे त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.  दरम्यान, सामूहिक बलात्कार आणि पीडितेच्या वडलांच्या मृत्युप्रकरणी उत्तर प्रदेश सरकारने सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाच्या तपासासाठी नियुक्त करण्यात आलेल्या एसआयटीने दिलेल्या अहवालाच्या आधारावर सरकारने आमदार आणि अन्य संशयितांविरोधात गुन्हा दाखल करून सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिले होते. "मात्र आपण आरोपी नसून, मी बलात्कार केलेला नाही. माझ्याविरोधात अपप्रचार केला जात आहे," असा दावा सेंगर यांनी केला होता.   नेमके काय आहे प्रकरण?  भाजपा आमदार कुलदीपसिंग सेनगर व त्यांच्या साथीदारांनी बलात्कार केल्याचा आरोप युवतीने केला आहे. युवती व तिच्या कुटुंबीयांनी रविवारी (8 एप्रिल) मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर केलेला आत्मदहनाचा प्रयत्न सुरक्षारक्षकांनी हाणून पाडला होता. या वेळी युवतीच्या वडिलांना पोलिसांनी अटक केली होती. मात्र त्यांना पोलीस कोठडीत रविवारी रात्री अत्यवस्थ वाटू लागले. परंतु उनाव जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान सोमवारी ते मरण पावले.  आयोगाची सरकारला नोटीसराष्ट्रीय मानवी हक्क आयोगाने यूपी सरकार आणि राज्याच्या पोलीसप्रमुखांना नोटीस बजावली आहे. या प्रकरणाचा चोवीस तासांत अहवाल देण्याचे त्यांना सांगण्यात आले असून, पीडित कुटुंबाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची काळजी घेण्याचे निर्देशही दिले आहेत.

भाजपा आमदाराच्या भावाला अटकयुवतीवर बलात्कार केल्याप्रकरणी भाजपाचे आमदार कुलदीपसिंग सेनगर यांचा भाऊ अतुलसिंग सेनगर याला उनाव येथून लखनऊ क्राइम ब्रँचने अटक केली आहे. कुलदीपसिंग व अतुलसिंग या दोघांनी युवतीच्या वडिलांना आठवडाभरापूर्वी मारहाण केल्याचीही तक्रार पोलिसांकडे करण्यात आली होती. यासंदर्भात युवतीने पत्रकारांना सांगितले की, दोन्ही भावांनी माझ्या आयुष्याचे मातेरे केले आहे. दोन्ही भावांना अटक झाली पाहिजे.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrimeगुन्हाBJPभाजपाMLAआमदार