Unlock 4.0 : देशाला अनलॉक 4 चे वेध; मेट्रो, विमान, चित्रपटगृहे, शाळा सुरु होणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2020 11:11 AM2020-08-25T11:11:32+5:302020-08-25T11:12:14+5:30

Unlock 4.0 आतापर्यंत मेट्रो, सिनेमा टॉकिज, स्विमिंग पूल, एंटरटेन्मेंट पार्क, थिएटर, बार, ऑडिटोरिअम, असेंब्ली हॉल सारख्या गर्दी होऊ शकणाऱ्या जागा बंद ठेवण्यात आल्या आहेत. यापैकी काही जागा खोलण्याची परवानगी मिळण्याची शक्यता आहे. 

Unlock 4.0: Country waiting for unlock 4; Metro, planes, cinemas, schools to start? | Unlock 4.0 : देशाला अनलॉक 4 चे वेध; मेट्रो, विमान, चित्रपटगृहे, शाळा सुरु होणार?

Unlock 4.0 : देशाला अनलॉक 4 चे वेध; मेट्रो, विमान, चित्रपटगृहे, शाळा सुरु होणार?

googlenewsNext

देशातील जनतेला आता अनलॉक 4 चे वेध लागले असून केंद्र सरकार यावेळी फक्त निर्बंध असलेल्या गोष्टींची यादीच प्रसिद्ध करणार असल्याचे सांगितले जात आहे. या लिस्टमध्ये ज्या गोष्टींचा समावेश नसेल त्या सुरु करण्याची परवानगी आपसूकच दिली जाणार आहे. आतापर्यंत मेट्रो, सिनेमा टॉकिज, स्विमिंग पूल, एंटरटेन्मेंट पार्क, थिएटर, बार, ऑडिटोरिअम, असेंब्ली हॉल सारख्या गर्दी होऊ शकणाऱ्या जागा बंद ठेवण्यात आल्या आहेत. यापैकी काही जागा खोलण्याची परवानगी मिळण्याची शक्यता आहे. 


याशिवाय सामाजिक, राजकीय सभा, केळ, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनावर बंदी घालण्यात आली आहे. दिवाळीपर्यंत यापैकी काही गोष्टी खुल्या होण्याची शक्यता आहे. दिल्लीमध्ये 1 सप्टेंबरपासून मेट्रो सुरु करण्यास परवानगी दिली जाण्याची शक्यता आहे. दिल्ली मेट्रो रेल्वे निगमने रविवारी यावर पत्रक काढले आहे. यामध्ये त्यांनी मेट्रो सुरु करण्याची तयारी दर्शविली आहे. मुख्यमंत्री केजरीवाल यांनीही दिल्लीला इतर राज्यांपेक्षा वेगळे समजावे. मेट्रो सुरु करावी, अशी मागणी केली आहे. दिल्ली मेट्रो 22 मार्चपासून बंद आहे. 


विमानसेवा
दिवाळीपर्यंत विमानोड्डाणे पूर्णपणे सुरु होण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांनी दिवाळीपर्यंत कोरोनाच्या आधीची स्थिती आल्यास विमान सेवा आधीसारखीच सुरु केली जाईल असे म्हटले आहे. रविवारी 98800 प्रवाशांनी विमान सेवेद्वारे प्रवास केला. ही संख्या कोरोनापूर्व काळाच्या 33 टक्के आहे. 


चित्रपटगृहे सुरु होणार?
दुसरीकडे फिल्म आणि सिरिअलची शुटिंग सुरु झाले आहे. मुंबईत हे सुरु असले तरीही दिल्लीमध्ये केवळ जाहिरातींचेच शुटिंग झाले आहे. यामुळे दिवाळीपर्यंत सिनेमागृहे देखील सुरु होण्याची शक्यता आहे. शुटिंगवेळी सेटवर सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे आदेश आहेत. चित्रपटगृहे सुरु करण्यासाठी नियमावली बनविली जात आहे. ही नियमावली शेवटच्या टप्प्यात असल्याचे सुत्रांनी सांगितले. काही देशांमध्ये पुन्हा थिएटर सुरु झाली आहेत. 


शाळा, कॉलेजचे काय?
अनलॉक ४.0 मध्ये केंद्र सरकार शाळा उघडण्यावर विचार करत नाहीय. मात्र, काही राज्यांनी उच्च शिक्षणाच्या संस्था, क़ॉलेज सुरु करण्याची विनंती करत आहेत. यामुळे शाळा एवढ्यात उघडणे शक्य नाही. मात्र, आयआयटी, आयआयएमसह सर्व कॉलेज आणि विद्यापीठे सुरु करण्यात येण्याची शक्यता आहे. मात्र, काही राज्ये ही बंदी कायम ठेवण्याचीही शक्यता आहे. महाराष्ट्रात आधीपासूनच सरकार परिक्षांना विरोध करत आहे. 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

IPL2020 उसेन बोल्ट वाढदिवसाच्या पार्टीनंतर कोरोना पॉझिटिव्ह; ख्रिस गेलही अडचणीत

Sushant Singh Rajput case: सुशांतच्या हत्येमागे दोन 'डॅडी'; जिम पार्टनर मित्राचा खळबळजनक आरोप

Video: अंतराळात खळबळ उडाली! पृथ्वीवर एकाचवेळी पाच UFO दिसले; रशियाने टिपले

IPL 2020 ला मोठा झटका; तगडा स्वदेशी स्पॉन्सर गमावला

किम जोंग उन कोमात, बहीण उत्तर कोरियाची सत्ताधारी; माजी सहकाऱ्याचा गौप्यस्फोट

Gold Rates सोने खरेदी करायचेय? जाणून घ्या योग्य वेळ अन् साधा संधी

Web Title: Unlock 4.0: Country waiting for unlock 4; Metro, planes, cinemas, schools to start?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.