पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी, दिल्ली पोलिसांना 'ई-मेल'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2018 11:17 IST2018-10-13T11:16:35+5:302018-10-13T11:17:57+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यापूर्वीही मोदींना जीवे मारण्याची धमकी देण्याचे पत्र

Unknown threatens to kill Modi, Delhi police got E-mail | पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी, दिल्ली पोलिसांना 'ई-मेल'

पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी, दिल्ली पोलिसांना 'ई-मेल'

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे वृत्ताने खळबळ उडाली आहे. मोदींना जीवे मारणार असल्याचा ई-मेल दिल्ली पोलिसांना मिळाला आहे. त्यानंतर, दिल्लीतील पोलीस यंत्रणा, गुप्तचर यंत्रणा आणि सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यापूर्वीही मोदींना जीवे मारण्याची धमकी देण्याचे पत्र पोलिसांच्या हाती लागले होते. त्यानंतर, आता पुन्हा एकदा दिल्ली पोलिसांकडे मोदींना जीवे मारण्याची धमकी देणारा मेल आला आहे. त्यानंतर सर्वच सुरक्षा यंत्रणांना हाय अलर्ट देण्यात आला असून पोलिसांकडून या मेलची चौकशी करण्यात येत आहे.

Web Title: Unknown threatens to kill Modi, Delhi police got E-mail