केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचे अमेठीतील नवीन घर तयार; गृहप्रवेशाची तयारी सुरू, पाहा PHOTOS
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2024 17:52 IST2024-02-01T17:51:13+5:302024-02-01T17:52:10+5:30
Amethi News: स्मृती इराण यांनी 2021 मध्ये घर बांधण्यासाठी जमीन घरेदी केली होती.

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचे अमेठीतील नवीन घर तयार; गृहप्रवेशाची तयारी सुरू, पाहा PHOTOS
Smriti Irani Amethi : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी त्यांचा मतदारसंघ असलेल्या उत्तर प्रदेशातील अमेठीमध्ये नवीन घर बांधले आहे. या घराचे काम अंतिम टप्प्यात असून, लवकरच इराणी यांचा गृहप्रवेश होईल. स्मृती इराणी यांनी 2021 मध्ये जमीन खरेदी केली होती. या घरामुळे त्यांच्या समर्थक व भाजप सदस्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या नवीन घराचे काही फोटोही समोर आले आहेत.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत स्मृती इराणी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा पराभव केला होता. अमेठीच्या जनतेनेही इराणी यांच्यावर विश्वास टाकला आणि मोठ्या मताधिक्याने त्यांना निवडून आणले. विजयी झाल्यानंतर इराणी यांनी अमेठीच्या जनतेला आश्वासन दिले होते की, त्या लवकरच जिल्ह्यात त्यांचे घर बांधतील.
त्यांनी गौरीगंज येथील मेदन मवई येथे घरासाठी जमीन खरेदी केली होती. आता या जागेवर एक मोठे घर बांधून तयार झाले आहे. लवकर त्यांचा गृहप्रवेश होईल. आता अमेठीच्या लोकांना आपल्या खासदाराला भेटण्यासाठी दिल्लीत जावे लागणार नाही. आता या घरातून त्या लोकांच्या समस्या ऐकून घेतील. तसेच, आगामी लोकसभा निवडणुकीची रणनीतीही येथूनच ठरवली जाणार आहे.