Union minister nitin gadkari comments about maharashtra politics sna | महाराष्ट्रातील ठाकरे सरकारची पावती फाटणार का?; नितीन गडकरी हसले आणि म्हणाले...

महाराष्ट्रातील ठाकरे सरकारची पावती फाटणार का?; नितीन गडकरी हसले आणि म्हणाले...

ठळक मुद्देगडकरी म्हणाले, प्रत्येक सरकार आपापल्या पद्धतीने चालत असते.यावेळी गडकरींना महाराष्ट्रातील राजकारणासंदर्भात अनेक प्रश्न विचारण्यात आले.यावेळी त्यांनी मोदी सरकारच्या कामांसंदर्भातही चर्चा केली.

नवी दिल्ली/मुंबईः मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाला एक वर्ष पूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर एका वृत्तवाहीनीने केंद्रीयमंत्री नितिन गडकरी यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांना अनेक प्रश्न विचारले. यात, "महाराष्ट्रातील सरकार नियमाने चालत आहे का? त्याचीही पावती फाटण्याची वेळ आली आहे, असे वाटते का?" असा प्रश्न आला. यावर, गडकरी एकदम हसले आणि त्यांनी या प्रश्नाला मोकळेपणाने उत्तर दिले.

गडकरी म्हणाले, प्रत्येक सरकार आपापल्या पद्धतीने चालत असते. मला वाटते, की देश अत्यंत गंभीर संकटातून जात आहे. कोरोना संकटाशी लढाई सुरू आहे. विरोधकांचे कामच असते टीका करणे. देशासमोर आर्थिक संकट आहे. त्याच्याशीही लढाई सुरू आहे. सध्या देशातील गरीब, मजूर, शेतकरी अत्यंत दुःखी आहेत. अशा वेळी, सर्व राजकीय पक्ष आणि नेत्यांनी एकत्रित येऊन या सर्वांना कशापद्धतीने खूश करता येईल, या सर्वांच्या समस्यां कशा सोडवता येतील आणि परिस्थितीतून मार्ग कसा निघेल, यासाठी काम करायला हवे. काही दिवसांसाठी राजकारण थांबवावे. जेव्हा ही समस्या संपेल, तेव्हा लोकशाही आहे, ज्यांच्यात जेवढा जोर आहे, त्याने तसा प्रयत्न करावा. 

CoronaVirusEpidemic : कोरोनाचा सामना; अमेरिकेची अॅक्शन, जगात 'असा' घेरला जातोय चीन

यावेळी महाराष्ट्रातील राजकारणावर पुन्हा प्रश्न विचारला असता गडकरी म्हणाले, मी जास्तवेळ दिल्लीतच असतो. महाराष्ट्रात महाराष्ट्र आणि मुंबईत माझे फारसे जानेही नाही. सध्या माझे संपूर्ण लक्ष कोरोना संकटावर आहे. पंतप्रधानांनी मझ्यावर काही जिल्ह्यांची जबाबदारी सोपवली आहे. केवळ त्यांच्याच संपर्कात मी असतो. बाकी राजकारणासंदर्भात मला माहीत नाही.

"चीनला 'बॅन' करा, उद्योग-धंदे भारतात हलवा"; अमेरिका तयार करत आहे 'मास्टर प्लॅन'

नारायण राणेंनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. त्यांचा तुम्हाला फोन आला होता का? असे विचारले असता. हो आला होता. ते फार चांगले नेते आहेत. त्यांच्याशी माझे नेहमीच बोलने होत असते. ते महाराष्ट्रातील एक हुशार आणि अभ्यासू नेते आहेत, असे गडकरी म्हणाले. यावेळी त्यांनी मोदी सरकारच्या कामांसंदर्भातही चर्चा केली. 

केवळ सीमाच नव्हे, 'ही'देखील आहेत भारत-चीन वादाची 8 मुख्य कारणं

आजतक या वृत्त वाहिनीने आयोजित केलेल्या 'e-अजेंडा' कार्यक्रमातील 'विकासाचा अग्निपथ' या सत्रात गडकरी सहभागी झाले होते.

POK : पाकिस्तानने चीनच्या सोबतीने उचलले मोठे पाऊल; भारताची डोकेदुखी वाढण्याची शक्यता

Read in English

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title:   Union minister nitin gadkari comments about maharashtra politics sna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.