coronavirus crisis china on target of america india and some other countries sna | CoronaVirusEpidemic : कोरोनाचा सामना; अमेरिकेची अॅक्शन, जगात 'असा' घेरला जातोय चीन

CoronaVirusEpidemic : कोरोनाचा सामना; अमेरिकेची अॅक्शन, जगात 'असा' घेरला जातोय चीन

ठळक मुद्देकोरोनाच्या मुद्द्यावर संपूर्ण जगाच्या टीकेला सामोरा जात असलेला चीन आता सर्वच देशांकडून घेरला जात आहे.नुकतेच चीनने आपल्या सैन्याला युद्धाची तयारी करण्याचे आदेशही दिले होते. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सार्वजनिकरित्या कोरोना व्हायरसला चीनी व्हायरस म्हणून संबोधले आहे.

पेइचिंग : कोरोनाच्या मुद्द्यावर संपूर्ण जगाच्या टीकेला सामोरा जात असलेला चीन आता सर्वच देशांकडून घेरला जात आहे. मात्र, असे असतानाही त्याची मग्रुरी कमी झालेली नाही. नुकतेच चीनने आपल्या सैन्याला युद्धाची तयारी करण्याचे आदेशही दिले होते. मात्र, आता अमेरिकेने जागतीक आरोग्य संघटनेशी असलेले सर्व संबंध तोडल्याने चीनला मोठा झटका बसला आहे.

कोरोनाच्या मुद्द्यावर घेरला गेलाय चीन -
कोरोना व्हायरस जागतीक महामारी बनला आहे. यामुळे जगातील सर्वच देश चीनला लक्ष्य करत आहेत. काही दिवसांपूर्वी, युरोपीय युनियनने कोरोना व्हायरसच्या उत्पत्तीची चौकशी व्हावी, अशी मागणी करणारा प्रस्ताव डब्ल्यूएचओच्या बैठकीत मांडला होता. त्यावेळी चीनने या प्रस्तावाला कडाडून विरोध केला. मात्र, जगाचा दबाव वाढल्यानंतर चीनचे पंतप्रधान ली केकियांग आणि परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी या चौकशीला समर्थन असल्याचे म्हटले होते.

अमेरिकेच्या एकाच निर्णयाने चीन बिथरला; तैवानला दिली हल्ल्याची धमकी

अमेरिकेशी संबंध चिघळले -
ट्रेड वॉरसंदर्भात अमेरिका आणि चीन यांच्यातील तणाव अद्याप निवळलाही नव्हता. तोच कोरोना व्हायरसने आगीत तेल ओतण्याचे काम केले. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सार्वजनिकरित्या कोरोना व्हायरसला चीनी व्हायरस म्हणून संबोधले आहे. त्यांनी चीनवर या व्हायरसच्या जागतीक प्रसाराचा आरोपही लावला आहे. एवढेच नाही, तर या व्हायरसच्या चौकशीसाठी चीन सहकार्य करत नाही, असा आरोपही अमेरिकेने केला आहे.

"चीनला 'बॅन' करा, उद्योग-धंदे भारतात हलवा"; अमेरिका तयार करत आहे 'मास्टर प्लॅन'

कोरोनाचा सर्वाधिकि फटका बसलेल्या अमेरिकेने जागतीक आरोग्य संघटनेशी असलेले आपले सर्व संबंध तोडले आहेत. खुद्द अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीच याची घोषणा केली. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा चीनवर निषाणाही साधला.

अमेरिकेने चीनवर घातले निर्बंध -
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी काही चीनी नागरिकांवर अमेरिकेत येण्यासाठी निर्बंध घालणार असल्याची घोषणा केली.  एवढेच नाही, तर चीनमधून अमेरिकेत होणाऱ्या गुंतवणुकीचे नियमही  कठोर करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. काही दिवसांपूर्वी अमेरिकन काँग्रेसमध्ये चीनविरोधात कठोर पावले उचलण्यासंदर्भात एक विधेयकही सादर करण्यात आले आहे.

कोरोनाने अमेरिकेत घेतले 1 लाखहून अधिक बळी, नेमकी कुठे झाली 'सुपरपावर'ची चूक

सीमा विवादावरून भारत-चीन संबंध खराब -
लडाखमध्ये सुरू असलेल्या रस्त्याच्या कामांवरून भारत आणि चीन यांच्यात अद्यापही तणावाचे वातावरण आहे. दोन्ही देशाचे जवान सीमेवर एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. तणाव वाढवल्यानंतर आता चीन शांतीदूत बनून आपसातले वाद मिटवण्याची भाषा बोलू लागला आहे. लडाखमध्ये भारत एवढ्या आक्रमकतेने चीनला जशास तसे उत्तर देईल याची अपेक्षा चीनला नव्हती. मे महिन्यात सीमा वादावरून दोन वेळा भारत आणि चीनी सैन्यात वाद झाला आहे. 

केवळ सीमाच नव्हे, 'ही'देखील आहेत भारत-चीन वादाची 8 मुख्य कारणं

ऑस्ट्रेलियाशीही चीनचा वाद -
कोरोना व्हायरसच्या चौकशीचे समर्थन केल्याने ऑस्ट्रेलियाशीही चीनचा तणाव वाढला आहे. हे दोघेही एकमेकांवर निशाणा साधत आहेत. काही दिवसांपूर्वी चीनने ऑस्ट्रेलियाला 'अमेरिकेचा पाळीव कुत्रा', असे संबोधले होते. यावर ऑस्ट्रेलियन प्रशासनाने तीव्र नाराजीही व्यक्त केली होती. चीनने ऑस्ट्रेलियातून येणारा मांसावर आधीच बंदी घातली आहे. 

POK : पाकिस्तानने चीनच्या सोबतीने उचलले मोठे पाऊल; भारताची डोकेदुखी वाढण्याची शक्यता

तैवानकडून चीनच्या हस्तक्षेपाला विरोध -
याशिवाय चीनचे तैवानशीही संबंध बिघडलेले आहेत. राष्ट्रपती त्साई-इंग वेन दुसऱ्यांदा निवडून आल्याने ड्रॅगनचा तिळपापड झाला आहे. चीनने नुकतेच तैवानच्या सीमेवर दोन लढाऊ जहाज तैनात केले होते. तसेच चीनने तैवानला हल्ल्याची धमकीही दिली आहे. मात्र चीनच्या धमकीलाही तैवानने चोख उत्तर दिले होते. तैवान सातत्याने चीनच्या हस्तक्षेपाला विरोध करत आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: coronavirus crisis china on target of america india and some other countries sna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.