"मी खासदार आणि पत्नी आमदार, तरीही मुलाला व्यसनापासून वाचवू शकलो नाही", केंद्रीय मंत्र्याची खदखद

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2022 03:50 PM2022-12-13T15:50:59+5:302022-12-13T15:53:06+5:30

आज अंमली पदार्थांचे व्यसन हा देशात मोठा चिंतेचा विषय बनला आहे.

Union Minister Kaushal Kishore said that I MP and wife MLA, still could not save the child from addiction | "मी खासदार आणि पत्नी आमदार, तरीही मुलाला व्यसनापासून वाचवू शकलो नाही", केंद्रीय मंत्र्याची खदखद

"मी खासदार आणि पत्नी आमदार, तरीही मुलाला व्यसनापासून वाचवू शकलो नाही", केंद्रीय मंत्र्याची खदखद

googlenewsNext

नवी दिल्ली : माझ्या मुलाचा जीव व्यसन केल्यामुळे गेला, त्यामुळे कोणत्याही आई-वडिलांनी आपले मूल व्यसनामुळे गमावू नये अशी माझी इच्छा आहे, असे केंद्रीय मंत्री कौशल किशोर यांनी म्हटले आहे. मी माझा मुलगा फक्त यासाठी गमावला आहे कारण तो व्यसनाच्या विळख्यात अडकला होता, असेही त्यांनी म्हटले. खरं तर मंत्री कौशल कुमार यांनी मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती यांच्या अंमली पदार्थ विरोधी मोहिमेचे समर्थन केले. उमा भारती यांचा प्रयत्न समाजाला दिशा देणारा असून लोकांचा जीव वाचवणारा आहे असे मंत्री किशोर यांनी म्हटले.

"आज अंमली पदार्थांचे व्यसन हा देशात मोठा चिंतेचा विषय बनला आहे. आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी इंग्रजांना देशातून पळवून लावले, पण जाताना त्यांनी देशात व्यसनाचे जाळे सोडले. वेगवेगळ्या व्यसनाच्या सेवनामुळे दरवर्षी लाखो लोकांचा मृत्यू होत आहे. त्यामुळेच निरोगी राहायचे असेल तर व्यसनाला नाही म्हणा. त्यामुळे मी आवाहन करतो की, त्यापासून दूर राहा", अशा शब्दांत सौरभ कुमार यांनी तरूणाईला व्यसनापासून दूर राहण्याचा सल्ला दिला. खरं तर अलीकडेच केंद्रीय मंत्री जबलपूरला गेले होते. यावेळी त्यांनी अमली पदार्थांबाबत अनेक गोष्टींवर भाष्य केले. 

"मुलाला व्यसनापासून वाचवू शकलो नाही"
केंद्रीय मंत्री कौशल किशोर यांनीही याबाबत ट्विट केले आहे की, "मी स्वत: खासदार झालो आणि माझी पत्नी आमदार झाल्यानंतरही मी माझ्या मुलाचे आयुष्य व्यसनापासून वाचवू शकलो नाही, पण आता कोणत्याही आई-वडिलांनी आपले मूल व्यसनामुळे गमावू नये अशी माझी इच्छा आहे. व्यसनामुळे कोणतीही महिला विधवा होऊ नये, व्यसनामुळे कोणतेच मूल पितृहीन होऊ नये."

केंद्रीय मंत्र्याची खदखद 
आपल्या मुलाला अंमली पदार्थांचे व्यसन कधी लागले हे कळलेही नाही, असे केंद्रीय मंत्री म्हणाले. यामुळे त्याची प्रकृती ढासळू लागली. त्याला उपचारासाठी डॉक्टरांकडे नेले असता त्याचे यकृत खराब झाल्याचे दिसून आले. डॉक्टरांनी त्याला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो अपयशी ठरला आणि 2020 मध्ये त्याचा मृत्यू झाला. केंद्रीय मंत्री यांनी म्हटले की, त्याच्या अंत्यसंस्काराला प्रज्वलित करत असताना, त्यांनी संकल्प केला की मी आता अंमली पदार्थ विरोधी मोहिमेत सक्रियपणे सहभागी होईल आणि लोकांना त्यापासून दूर राहण्यासाठी प्रेरित करेल. तेव्हापासून ते सातत्याने लोकांना अमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत जागरूक करत आहे.

 सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

  

Web Title: Union Minister Kaushal Kishore said that I MP and wife MLA, still could not save the child from addiction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.