शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

...अन् केंद्रीय मंत्री सिंधियांनी स्वत:चा मास्क माजी मंत्र्याला घातला; व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2021 2:48 PM

केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी भाजप नेत्याला घातला वापरलेला मास्क

भोपाळ: देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरत आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. हा धोका टाळण्यासाठी लसीकरणासोबतच कोविड प्रतिबंधात्मक नियमांचं काटेकोरपणे पालन करणं गरजेचं आहे. सोशल डिस्टन्सिंगसोबतच मास्कचा वापर करण्याची आवश्यकता आहे. मात्र काही जण मास्क वापरण्यास टाळाटाळ करतात. यात सर्वसामान्यांसह राजकारण्यांचादेखील समावेश आहे. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात ते स्वत:चा मास्क काढून माजी मंत्री अनुप मिश्रा यांना घालताना दिसत आहेत. मिश्रा हे माजी दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींचे भाचे आहेत. मिश्रा विनामास्क दिसताच सिंधिया यांनी त्यांना स्वत:चा मास्क घातला. सिंधिया यांच्या बेजबाबदार वर्तनावर विरोधकांनी टीका केली आहे.

गुरुवारी सकाळी ज्योतिरादित्य सिंधिया ग्वाल्हेरमधल्या मांढरे माता मंदिरात गेले होते. मंदिरात प्रवेश करताना सिंधिया यांनी अनुप मिश्रा यांना विनामास्क पाहिलं. सिंधिया यांनी स्वत:चा मास्क उतरवला आणि तोच मिश्रा यांच्या तोंडावर चढवला. त्यानंतर सिंधिया यांनी मंदिरात जाऊन देवीचं दर्शन घेतलं. सिंधिया यांच्या कृतीचा काँग्रेसनं समाचार घेतला. भाजप नेत्यांच्या रॅलींवर कोरोना संकटात कोट्यवधी रुपये खर्च होत आहेत आणि त्यांचे नेते सुरक्षेच्या नावाखाली वापरलेले मास्क वाटत आहेत, अशा शब्दांत काँग्रेसनं सिंधियांवर निशाणा साधला.

टॅग्स :Jyotiraditya Scindiaज्योतिरादित्य शिंदे