शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

'एका सदस्याला राजकारणात १३ वेळा लॉन्च केले'; अमित शाह यांचा राहुल गांधींवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2023 18:22 IST

काँग्रेसने आणणेल्या अविश्वास प्रस्तावावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलं.

नवी दिल्ली: केंद्र सरकारविरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावाविरोधात काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी जोरदार भाषण केलं. यावेळी त्यांनी मणिपूर हिंसाचारवरुन मोदी सरकारवर हल्लाबोल केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपर्यंत मणिपूरला गेले नाही. वास्तव म्हणजे आता मणिपूर उरलाच नाहीय. मणिपूरमधील परिस्थिती अतिशय भयानक आहे. मोदींनी मणिपूरचे विभाजन केले. मोदी सरकारने मणिपूरची हत्या केली, असा घणाघात राहुल गांधी यांनी यावेळी केला. 

काँग्रेसने आणणेल्या अविश्वास प्रस्तावावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलं. अविश्वास प्रस्तावाची तीन उदाहरणे आहेत. दोन युपीए सरकारच्या विरोधात तर एक एनडीए विरुद्ध. १९९३मध्ये नरसिंह सरकार होते. त्याच्या विरोधात प्रस्ताव आला होता. त्यांनी अविश्वास ठराव जिंकला. २००८मध्ये मनमोहन सरकार विश्वासदर्शक ठराव घेऊन आले. त्यांच्याकडे बहुमत नाही असे वातावरण होते. पण खासदारांना कोट्यवधी रुपयांची लाच देण्यात आली आणि सरकार वाचले. १९९९मध्ये अटल सरकार होते. अविश्वास प्रस्ताव आला. काँग्रेसने जे केले ते भाजपाही करू शकली असती, पण अटलजींनी आपले म्हणणे मांडले आणि संसदेचा निर्णय मान्य केला, असं अमित शाह यांनी सांगितले. 

अमित शाह यांनी राहुल गांधी यांच्यावर देखईल निशाणा साधला. ते म्हणाले की, या सभागृहात एक असा नेता आहे ज्याला १३ वेळा राजकारणात लॉन्च केले गेले. मात्र प्रत्येक वेळी ते अयशस्वी झाले. तो नेता एका गरीब आई कलावती (बुंदेलखंड, महोबा) च्या घरी जेवणासाठी गेला. संसदेत त्यांनी आई कलावती यांच्या गरिब परिस्थितीचे वर्णन केले. त्यानंतर सहा वर्षे काँग्रेसचे सरकार होते. पण त्या कलावतीसाठी काहीच केले नाही. त्या कलावतीला घर, वीज, गॅस, धान्य, शौचालय, आरोग्य देण्याचे काम नरेंद्र मोदींनी केले. ज्या कलावतींच्या घरी तुम्ही जेवायला गेलात, तिचाही मोदींवर अविश्वास नाही, अशी टीका अमित शाह यांनी केली. 

दरम्यान, काँग्रेसने गरीबी हटावचा नारा दिला. पण गरिबी तशीच राहिली. पण मोदींनी गरिबी पाहिली होती, त्यामुळे त्यांना लोकांच्या समस्या समजल्या. पंतप्रधान मोदींनी ९ वर्षांत ११ कोटींहून अधिक कुटुंबांना शौचालये दिली. लोक क्लोराईडयुक्त पाणी पितात. मोदींनी हर घर जल योजनेतून १२ कोटींहून अधिक लोकांच्या घरात पाणी आणले. काँग्रेस कर्जमाफीसाठी लॉलीपॉप देत असे, तर शेतकऱ्याला कर्जमाफी हा भाजपचा अजेंडा आहे. काँग्रेसने नुसत्या घोषणा केल्या, पण भाजपाने अंमलबजावणी केली, असे अमित शाह म्हणाले.

टॅग्स :Amit Shahअमित शाहMonsoon Session Of Parliamentसंसेदेचे पावसाळी अधिवेशनParliamentसंसदRahul Gandhiराहुल गांधी