शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus Vaccine : लसींच्या पुरवठ्यावरून महाराष्ट्र, छत्तीसगढमध्ये राजकारण, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2021 08:38 IST

राज्य पातळीवर आम्ही लसीचे डोस देतो. लसींच्या वितरणाबाबत कोणतंही राजकारण नाही, आरोग्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण

ठळक मुद्देराज्य पातळीवर आम्ही लसीचे डोस देतो : डॉ. हर्षवर्धनलसींच्या वितरणाबाबत कोणतंही राजकारण नसल्याचं आरोग्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण

गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला महाराष्ट्राला मोठा फटका बसताना दिसत आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरू असलेली लसीकरण मोहीम मंदावल्याचं दिसून आलं होतं. तसंच महाराष्ट्र, छत्तीसगढसारख्या राज्यांमधून आपल्याला लसींचा पुरवठा योग्य प्रमाणात होत नसल्याचा आरोपही करण्यात आला होता. यावर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. "आम्ही राज्य स्तरावर लसींचा पुरवठा करत आहेत. त्या लसी सेंटर्सपर्यंत पोहोचवणं हे त्या राज्याचं काम आहे. वितरणाबाबत कोणतंही राजकारण करण्यात आलं नाही," असं स्पष्टीकरण केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिलं.राज्यांना लसींचा पुरवठा योग्य प्रमाणात होत नसल्याच्या आरोपांवर डॉ. हर्षवर्धन यांना सवाल करण्यात आला. "आम्ही राज्यांच्या पातळीवर लसींचा पुरवठा करत आहोत. त्या लसी लसीकरण केंद्रांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी राज्य सरकारची असते. जर कोणत्याही राज्यानं योग्य प्रकारे तयारी केली नाही आणि त्यामुळे जर लसींचे डोस वाया जात असतील तर हे त्या राज्य सरकारचं अपयश आहे. लसींच्या वितरणाबाबत कोणतंही राजकारण केलं जात नाही," असंही डॉ. हर्षवर्धन म्हणाले. त्यांनी आजतकला दिलेल्या विशेष मुलाखतीत यावर भाष्य केलं. महाराष्ट्र, छत्तीसगढमध्ये राजकारण"कोवॅक्सिनबाबक महाराष्ट्र आणि छत्तीसगढमध्ये विशेषकरून राजकारण होत होतं. छत्तीसगढला तर आम्ही जानेवारी महिन्यातचं लसींचा पुरवठा केला होता. परंतु त्यांनी ३ महिने लसीकरणाला सुरूवातच केली नाही. दोन वेळा मी त्या राज्याच्या आरोग्यमंत्र्यांना पत्र लिहिलं त्यानंतर मुख्यमंत्र्यांनाही पत्र लिहिलं. परंतु ३ महिन्यापर्यंत केवळ राजकारण सुरू होतं. लोकांना लसीकरण करण्यात आलं नाही. मार्च अखेरिस त्यांनी लसीकरणाला सुरूवात केली," असं त्यांनी नमूद केलं. 

महाराष्ट्राला सर्वाधिक लसी आजपर्यंत जर कोणत्या राज्याला आम्ही सर्वाधिक लसी दिल्या असतील तर ते राज्य महाराष्ट्र आहे. महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थान ही ३ अशी राज्ये आहेत ज्यांना १ कोटी पेक्षा अधिक लसींच्या डोसचा पुरवठा करण्यात आला. कोरोना लसीकरणाचा राज्यांच्या लोकसंख्येशी काही संबंध नाही. ते अनेक गोष्टींवर अवलंबून असतं. जर तुम्ही लोकसंख्येच्या दृष्टीनं पाहिलं तर उत्तर प्रदेशला सर्वाधिक लसी मिळायला हव्या होत्या. परंतु तसं झालं नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. 

सरासरी लसीकरण अमेरिकेपेक्षाही अधिक "लसीकरण मोहीम ही एक डायनॅमिक प्रोसेस आहे. ती नंबर्सच्या आधारावर पाहता येणार नाही. आपल्याकडे देशात दिवसाला होणारं लसीकरण हे अमेरिकेपेक्षाही अधिक आहे. आपण सर्वात जलद गतीनं आणि सर्वात कमी वेळा ९ कोटी लोकांचं लसीकरण पूर्ण केलं आहे," अशी माहितीही डॉ. हर्षवर्धन यांनी दिली. लसीकरण एक सायंटिफिक प्रोसेस असून जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ते पहिले ज्येष्ठ नागरिक किंवा काही आजार असलेल्या लोकांना देणं अपेक्षित आहेत. त्या आधावरच आम्ही सुरुवातीला आरोग्य कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाला सुरूवात केली आणि त्यानंतर त्याची व्याप्ती वाढवल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याMaharashtraमहाराष्ट्रCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसIndiaभारत