‘यूएनआय’च्या कार्यालयाला टाळे; पत्रकारांना धक्काबुक्की, ४० वर्षांपासून जमिनीचे भाडे थकविले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2026 07:23 IST2026-03-22T07:23:07+5:302026-03-22T07:23:21+5:30

या जमिनीचे वाटप १९७९ मध्ये झाले होते, जे नियमांच्या उल्लंघनामुळे रद्द करण्यात आले.

uni office locked journalists beaten up land rent unpaid for 40 years | ‘यूएनआय’च्या कार्यालयाला टाळे; पत्रकारांना धक्काबुक्की, ४० वर्षांपासून जमिनीचे भाडे थकविले

‘यूएनआय’च्या कार्यालयाला टाळे; पत्रकारांना धक्काबुक्की, ४० वर्षांपासून जमिनीचे भाडे थकविले

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : दिल्लीतील 'रफी मार्ग' येथील ऐतिहासिक 'युनायटेड न्यूज ऑफ इंडिया' (यूएनआय) या वृत्तसंस्थेच्या कार्यालयाला शुक्रवारी केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने पोलीस बंदोबस्तात टाळे ठोकले. ४० वर्षांपासून जमिनीचा वापर न करणे आणि भाडे थकवल्याप्रकरणी उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर ही कारवाई करण्यात आली. सुमारे ४०९ कोटी रुपये मूल्य असलेल्या या जमिनीचे वाटप १९७९ मध्ये झाले होते, जे नियमांच्या उल्लंघनामुळे रद्द करण्यात आले.

या कारवाईदरम्यान पत्रकारांना झालेल्या धक्काबुक्कीचा 'प्रेस क्लब ऑफ इंडिया', 'एडिटर्स गिल्ड' आणि 'आयडब्ल्यूपीसी' यांसारख्या प्रमुख पत्रकार संघटनांनी तीव्र निषेध केला आहे. संघटनांच्या मते, पोलिसांनी महिला पत्रकारांशी अशोभनीय वर्तन केले आणि कर्मचाऱ्यांना त्यांचे वैयक्तिक सामानही घेऊ दिले नाही. प्रशासनाने कमालीची घाई करत 'अतिरेकी बळाचा' वापर केल्याचा आरोप करत याला 'माध्यम स्वातंत्र्यावर हल्ला' म्हटले आहे. दुसरीकडे, पोलिसांनी सर्व आरोप फेटाळून लावत कायदेशीर प्रक्रियेचे पूर्णपणे पालन झाल्याचे स्पष्ट केले आहे. 

 

Web Title : यूएनआई कार्यालय सील; भूमि किराए के भुगतान न करने पर पत्रकारों से हाथापाई

Web Summary : दिल्ली का यूएनआई कार्यालय 40 वर्षों से किराया न चुकाने पर सील। पत्रकारों के साथ हाथापाई; प्रेस संगठनों ने पुलिस कार्रवाई की निंदा की।

Web Title : UNI Office Sealed; Journalists Manhandled Over Unpaid Land Rent

Web Summary : Delhi's UNI office sealed due to unpaid rent after 40 years. Journalists faced manhandling; press organizations condemn police action as media attack.