शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
4
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
5
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
6
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
7
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
8
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
9
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
10
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
11
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
12
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
13
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
14
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
15
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
16
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?
17
३ वर्षात १ लाखाचे झाले १५ लाखांपेक्षा अधिक, ६ महिन्यांत १८०% नं वधारला स्टॉक
18
"हे विजयाचं परिमाण असू शकत नाही, भारताने...!"; भारत-पाकिस्तान सामन्यासंदर्भात काय म्हणाले ओवेसी?
19
Royal Enfield ने जारी केली यादी; Hunter, Classic, Meteor..; पाहा सर्व गाड्यांची नवी किंमत

पंतप्रधान आवास योजनेतून राज्यात फक्त ६ घरे तयार , बांधायची होती दीड लाख घरे; राज्याने दिला नाही एकही पैसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 06:20 IST

विश्वास बसणार नाही, पण ही वस्तुस्थिती आहे. पंतप्रधान आवास योजनेखाली महाराष्ट्राने चालू आर्थिक वर्षातील २७ नोव्हेंबरपर्यंत केवळ ६ घरे बांधल्याची माहिती ‘लोकमत’च्या हाती लागली आहे.

- हरिश गुप्तानवी दिल्ली : विश्वास बसणार नाही, पण ही वस्तुस्थिती आहे. पंतप्रधान आवास योजनेखाली महाराष्ट्राने चालू आर्थिक वर्षातील २७ नोव्हेंबरपर्यंत केवळ ६ घरे बांधल्याची माहिती ‘लोकमत’च्या हाती लागली आहे. महाराष्ट्र सरकारने या वर्षात १ लाख ५0 हजार ९३४ घरे बांधणे अपेक्षित होते आणि ६६ हजार ८२८ घरांच्या बांधकामाला परवानगीही दिली होती.ग्रामविकास मंत्रालयाने पंतप्रधान आवास योजनेसाठी १२७.0४ कोटी रुपये दिले. पण धक्कादायक बाब म्हणजे महाराष्ट्र सरकारने या घरांसाठी एक पैसाही दिला नाही. केंद्र सरकार १ लाख ५0 हजार ९३९ घरांसाठी ११३0 कोटी रुपये देणार असून, महाराष्ट्राने ७५३ कोटी ४६ लाख रुपयांची व्यवस्था करणे अपेक्षित आहे. पण महाराष्ट्राने ती केलेलीच नाही, असे उपलब्ध कागदपत्रांवरून दिसते. काम इतक्या संथ गतीने सुरू असल्याचे पाहून केंद्र सरकारनेही ११.२४ टक्के रकमेचीच व्यवस्था केली.ग्रामीण विकास मंत्रालयाने म्हटले आहे की, २७ नोव्हेंबर २0१७ रोजी महाराष्ट्राकडे ७0५ कोटींहून अधिक रक्कम पडून आहे. महाराष्ट्र सरकारचा २0१६-१७मधील घरबांधणीचा वेग तुलनेने खूपच चांगला होता. तेव्हा २ लाख ३0 हजार ४२२ घरांचे लक्ष्य होते आणि त्यापैकी ३४ हजार ३९८ घरे बांधून पूर्ण झाली होती. म्हणजेच महाराष्ट्राने गेल्या वर्षी १५ टक्केच काम पूर्ण केले. अर्थात २0१६-१७मध्येही या घरांसाठी राज्याने काहीच निधी दिला नव्हता. केंद्राने १२९0 कोटींची तरतूद करून, त्यापैकी ६४५ कोटी रुपये मात्र दिले होते. महाराष्ट्राच्या ग्राम विकास विभागाच्या अधिकाºयांनी या वृत्तास दुजोरा दिला; तथा अंमलबजावणीत येत असलेल्या अडचणींचीही माहिती दिली.गुजरातही मागेचगुजरातने २0१६-१७मध्ये २६३ कोटी या घरांसाठी उपलब्ध करून दिले आणि केंद्राने त्या राज्याला ३६५ कोटी दिले. पण गुजरातनेही केवळ ६७६ घरेच बांधून पूर्ण केली. या आर्थिक वर्षात गुजरातने ७१.८९ कोटी तर केंद्राने १0७ कोटी रुपये दिले. अर्थात गुजरातने या वर्षात ३६ घरेच बांधली आहेत. गुजरातनेही ५७८ कोटींहून अधिक रक्कम खर्च केली नाही.

टॅग्स :HomeघरMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारIndiaभारत