चालकाचे नियंत्रन सुटल्याने कार नदीत कोसळली, लहान मूल आणि महिलांसह एकूण 5 जणांचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2021 11:42 AM2021-11-23T11:42:51+5:302021-11-23T12:07:41+5:30

सोमवारी रात्री उशिरा एक कार रांचीहून धनबादकडे जात असताना हा अपघात झाला.

An uncontrolled car crashed into a river, five people including children and women died on the spot | चालकाचे नियंत्रन सुटल्याने कार नदीत कोसळली, लहान मूल आणि महिलांसह एकूण 5 जणांचा जागीच मृत्यू

चालकाचे नियंत्रन सुटल्याने कार नदीत कोसळली, लहान मूल आणि महिलांसह एकूण 5 जणांचा जागीच मृत्यू

Next

धनबाद: झारखंडमधील धनबादमध्ये एक भीषण अपघात झाला आहे. भरधाव वेगाने जाणारी कार नदीत पडल्याने पाच जणांचा मृत्यू झाला. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये 1 बालक, दोन महिलांसह एकूण 5 जणांचा समावेश आहे. स्थानिक लोकांच्या मदतीने पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.

गोविंदपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हिंद हॉटेलजवळ ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री उशिरा एक कार रांचीहून धनबादकडे जात असताना कारचा वेग जास्त असल्याने चालकाचा तोल गेला आणि कार नदीत पडली. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांची गर्दी झाली.

सर्व 5 जणांचा जागीच मृत्यू

स्थानिक लोकांच्या माहितीवरुन पोलिस तेथे पोहोचले आणि क्रेनच्या मदतीने गाडी  बाहेर काढली. मात्र कारमधील सर्वांचा जागीच मृत्यू झाला. सध्या स्थानिक लोकांच्या मदतीने पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत. अलीकडेच झारखंडमधील लातेहार जिल्ह्यातील मनिका पोलीस स्टेशन हद्दीतील डोमुहान नदीजवळ NH 75 वर बस आणि ट्रकमध्ये भीषण टक्कर झाली होती. या अपघातात ट्रकमधील चालकाचा मृत्यू झाला होता, तर 25 जण गंभीर जखमी झाले होता.

Web Title: An uncontrolled car crashed into a river, five people including children and women died on the spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.