शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

राजस्थानात मतांच्या वाढलेल्या टक्केवारीमुळे काँग्रेसमध्ये अस्वस्थता

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2019 03:31 IST

विरोधात कौल देण्याची परंपरा : मतदारांमध्ये नाराजी

सुहास शेलारजयपूर : ‘मोदी तुझसे बैर नहीं, रानी तेरी खैर नहीं’ असा नारा देत राजस्थानी मतदारांनी विधानसभा निवडणुकीत सत्ता परिवर्तन घडवून आणले. काँग्रेसने मोठमोठी आश्वासने देत अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केले. मात्र, विधानसभा निवडणुकी वेळी जाहीरनाम्यातून दिलेल्या आश्वासनांपैकी एकाचीही पूर्तता न झाल्याने शेतकरी, कामगार आणि बेरोजगारांनी सत्ताधाऱ्यांविरोधात आवाज उठविण्यास सुरुवात केली. ऐन लोकसभेच्या तोंडावर काँग्रेससमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. शिवाय पहिल्या टप्प्यातील मतदानाचा वाढलेला टक्काही काँग्रेसची धाकधूक वाढविणारा आहे. सत्ताधाऱ्यांच्या विरोधात कौल देण्याची राजस्थानी मतदारांची परंपरा राहिली आहे.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत राजस्थानातील सर्व २५ जागा भाजपने जिंकल्या होत्या. कालांतराने मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या एकछत्री कारभाराला कंटाळून अनेक ज्येष्ठ नेत्यांनी पक्षाला रामराम केला. त्यामुळे भाजपला राज्यातील सत्ता गमवावी लागली. मात्र, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शेतकºयांना सत्तेत येताच १० दिवसांत कर्जमाफीचे दिलेले आश्वासन सहा महिने उलटूनही पूर्ण न झाल्याने शेतकऱ्यात रोष आहे. शिवाय शिक्षण, बेरोजगारी, आरक्षणप्रश्नी काँग्रेसने अद्याप ठोस भूमिका न घेतल्याने सर्वसामान्यांत नाराजी आहे.

सत्तेत आल्यापासून गहलोत सरकारने एकही मोठा निर्णय घेतलेला नाही. राहुल गांधी यांच्या परवानगीशिवाय गहलोत निर्णय घेऊ शकत नाहीत, असा संदेश सोशल मीडियावर फिरल्याने भाजपच्या हातात आयते कोलीत मिळाले आणि त्यांनी गांधी-गहलोत-पायलट यांच्यावर सडकून टीका केली. भाजपच्या सोशल सेलने निवडणूक जाहीर झाल्यापासून काँग्रेसविरोधी वातावरण तयार केले. शिवाय पक्षाच्या मधल्या फळीने तळागळात जाऊन प्रचार केला. पहिल्या टप्प्यातील मतदाना वेळीही भाजपचे कार्यकर्ते गावागावांत जाऊन नागरिकांना घराबाहेर पडून मतदान करण्याचे आवाहन करीत होते. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत मतदानाचा टक्का वाढणे ही भाजपसाठी जमेची बाजू असल्याचे विश्लेषक सांगतात.

वसुंधरा राजेंना ठेवले प्रचारापासून दूरविधानसभा निवडणुकी वेळी ‘मोदी तुझसे बैर नहीं, रानी तेरी खैर नहीं’ असा उघड नारा मतदारांनी दिला होता. त्यामुळे मोदींविषयी असलेले सर्वसामान्यांचे ‘मत’परिवर्तन होऊ नये म्हणून भाजपने खबरदारी घेतली आहे. वसुंधरा राजे कमीत कमी प्रचारसभांमध्ये कशा दिसतील, याची रणनीती अमित शहांनी आखल्याचे सूत्रांनी सांगितले.

मतदारांनी रचला इतिहास२९ एप्रिल रोजी झालेल्या लोकसभेच्या पहिल्या टप्प्यासाठी राजस्थानी मतदारांनी विक्रमी मतदान करीत इतिहास रचला. १३ जागांसाठी सोमवारी ६८.२२ टक्के मतदान झाले. १९५२ च्या लोकसभा निवडणुकीपासूनची ही राजस्थानातील सर्वाधिक टक्केवारी आहे. सर्वाधिक तापमानाची नोंद झाली असतानाच, मतदारांचा उत्साहदेखील वाखाणण्याजोगा असल्याचे विश्लेषक सांगतात.

दुसऱ्या टप्प्यातील मतदारसंघदुसऱ्या टप्प्यासाठी ६ मे रोजी मतदान होणार आहे. या टप्प्यात गंगानगर, बिकानेर, चुरू, झुंझुनू, सीकर, जयपूर ग्रामीण, जयपूर, अलवर, भरतपूर, करौली-धौलपूर, नागौर, दौसा या मतदारसंघांचा समावेश आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकcongressकाँग्रेसBJPभाजपाRajasthanराजस्थानRajasthan Lok Sabha Election 2019राजस्थान लोकसभा निवडणूक 2019