नवी दिल्ली : मोदी सरकार सत्तारूढ होऊन १०० दिवस उलटल्यानंतरही निवडणुकीत दिलेली आश्वासने न पाळल्याच्या निषेधार्थ युवक काँग्रेसतर्फे मंगळवारी राजधानीत विविध ठिकाणी निदर्शने करण्यात आली. युवक काँग्रेसचे अध्यक्ष राजीव सातव यांनी १०० डेज मोदी फेल या नावाने सुरू केलेल्या या आंदोलनाचा उद्देश मोदी सरकारची आश्वासने व वास्तविकता यातील अंतर दाखवून देणे हा असल्याचे सांगितले. युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गृहमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर, कृषी भवन, रेल भवन व अन्य ठिकाणी निदर्शने केली. ही निदर्शने अजून दोन दिवस चालू ठेवणार असल्याचे त्यांनी पुढे सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}