ujjain saint of the aavahana akhara called rahul gandhi retarded intellect | "प्रियंका कधी मंदिरात जातात, तर कधी क्रॉस घालून फिरतात आणि राहुल गांधी...; दोघेही बहुरुपी"

"प्रियंका कधी मंदिरात जातात, तर कधी क्रॉस घालून फिरतात आणि राहुल गांधी...; दोघेही बहुरुपी"

नवी दिल्ली - आवाहन आखाड्याचे संत महामंडलेश्वर आचार्य शेखर यांनी एक वादग्रस्त विधान केलं आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) तसेच काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांच्यावर आक्षेपार्ह भाषेमध्ये टीका करण्यात आली आहे. आचार्य शेखर यांनी राहुल गांधींचा उल्लेख मंदबुद्धी असा केला आहे. यासोबतच त्यांना ब्राह्मी पिण्याचा सल्ला दिला आहे. आचार्य शेखर यांनी राहुल यांना उज्जैनला येण्याचं आमंत्रणही दिलं आहे. उज्जैनमधील चिंतामण गणेश मंदिर स्थानकातील पाटी उर्दू भाषेत असण्यावरुन आता राजकारणं सुरू झालं आहे. 

राहुल गांधी यांनी मदरशांसंदर्भात केलेलं विधान आणि प्रियंका गांधी यांनी मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेण्यावर आचार्य शेखर यांनी हल्लाबोल केला आहे. यासंदर्भात आचार्य शेखर यांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी राहुल यांना मंदबुद्धी म्हटलं. तसेच त्यांनी उज्जैनमध्ये येऊन ब्राम्ही प्यावी असा सल्लाही दिला आहे. प्रियंका गांधी यांच्यासंदर्भात भाष्य करताना, निवडणुकांच्या कालावधीमध्ये मत मागण्यासाठी दोघे बहुरुपी मंदिरांमध्ये जात आहे. जनतेने त्यांच्यापासून सावध राहण्याची गरज आहे असं देखील म्हटलं आहे.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना पाकिस्तानमधील मदरशांशी केली आहे. यावरुनच आवाहन आखाड्याचे संत नाराज आहेत. राहुल गांधींनी केलेली तुलना चुकीची असल्याचं मत आचार्य शेखर यांनी व्यक्त केलं आहे. राहुल गांधींना बुद्धी कमी आहे. ते पाकिस्तानला खूश करण्याचा प्रयत्न करत असल्याने अशी वक्तव्य करत आहेत. माझा काँग्रेसचा एक सल्ला आहे. या मंदबुद्धी माणसाला हटवा आणि त्याला ब्राम्ही प्यायला द्या तसेच उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये राहुल यांना मामाच्या गावी पाठवायला पाहिजे किंवा उज्जैनला पाठवा. त्यांना उज्जैनला पाठवल्यास त्यांचा मेंदू तल्लख व्हावा म्हणून त्यांना ब्राह्मी पाजता येईल असं म्हटलं आहे.

"निवडणुकांच्या कालावधीमध्ये मत मागण्यासाठी दोघे बहुरुपी मंदिरांमध्ये जातात, जनतेने सावध राहण्याची गरज"

प्रियंका आणि राहुल गांधी हे अनेक मंदिरांमध्ये जात असल्याच्या मुद्द्यावरुन आचार्य शेखर यांनी निशाणा साधला आहे. दोघांनीही गर्वाने आम्ही हिंदू असल्याचं सांगावं असं म्हटलं आहे. कधी ते मंदिरात जातात, कधी रुद्राक्षच्या माळा घालतात तर कधी क्रॉस घालून फिरतात तर कधी टोपी घालतात. अनेक प्रकारचे बहुरुपी सध्या फिरत आहे. कधी ते चिकन कुरकुरे खाऊन मानसरोवर यात्रेला जातात, जनतेने अशा बहुरुप्यांपासून सावध राहिलं पाहिजे, असा सणसणीत टोला देखील आचार्य शेखर यांनी लगावला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: ujjain saint of the aavahana akhara called rahul gandhi retarded intellect

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.