मोठी बातमी! २ कोटी लोकांचे आधार क्रमांक कायमचे बंद झाले; UIDAI ने सुरु केली मोहिम...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 17:52 IST2025-11-26T17:51:45+5:302025-11-26T17:52:54+5:30

UIDAI Aadhaar Deactivation : जेव्हापासून आधार आयडी सुरु झाले तेव्हापासून करोडो लोकांचे युआयडीएआयकडे रजिस्ट्रेशन झाले आहे. अद्यापही अनेकजण आधार प्रणालीपासून दूर आहेत. नवीन जन्मलेली मुले, त्यांचेही आधार क्रमांक तयार करावे लागत आहेत.

UIDAI Aadhaar Deactivation: Big news! Aadhaar numbers of 2 crore people have been permanently blocked; UIDAI has started a campaign... | मोठी बातमी! २ कोटी लोकांचे आधार क्रमांक कायमचे बंद झाले; UIDAI ने सुरु केली मोहिम...

मोठी बातमी! २ कोटी लोकांचे आधार क्रमांक कायमचे बंद झाले; UIDAI ने सुरु केली मोहिम...

जेव्हापासून आधार आयडी सुरु झाले तेव्हापासून करोडो लोकांचे युआयडीएआयकडे रजिस्ट्रेशन झाले आहे. अद्यापही अनेकजण आधार प्रणालीपासून दूर आहेत. नवीन जन्मलेली मुले, त्यांचेही आधार क्रमांक तयार करावे लागत आहेत. पुढे शिक्षणासाठी ते गरजेचे करण्यात आले आहे. अशावेळी युआयडीएआयकडे आकडा वाढतच चालला आहे. यामुळे UIDAI ने आधार क्रमांक निष्क्रीय करण्याची मोहीम सुरु केली आहे. 

आधार डेटाबेसची अचूकता आणि सुरक्षितता राखण्यासाठी देशव्यापी महत्त्वाकांक्षी मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत, २ कोटींहून अधिक मृत व्यक्तींचे आधार क्रमांक निष्क्रिय करण्यात आले आहेत. वास्तविक या १५ वर्षांच्या काळात करोडोंच्या संख्येने आधार धारक मृत झालेले आहेत. परंतू, त्याची माहिती युआयडीएआयला मिळालेली नसल्याने आजही त्यांचे आधार नंबर सक्रीय आहेत. यामुळ या आयडींचा वापर करून अनेक ठिकाणी फसवणूक केली जात आहे. बँक अकाऊंट उघडली जात आहेत, फ्रॉड केले जात आहेत. सरकारी योजनांचा लाभ घेतला जात आहे. 

यामुळे युआयडीएआयने ही मोहिम सुरु केली आहे. मृत व्यक्तींची माहिती घेऊन त्यांचे आधार क्रमांक बंद केले जात आहेत. लोकांना आपल्या घरातील मृत व्यक्तींचे आधार क्रमांक कसे बंद करायचे याची माहिती नाही. यामुळे आधारलाही याची माहिती मिळत नाहीय. यामुळे आता युआयडीएआय अशा मृत व्यक्तींची माहिती भारताचे रजिस्ट्रार जनरल, विविध राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या नागरी नोंदणी प्रणाली, सार्वजनिक वितरण प्रणाली आणि राष्ट्रीय सामाजिक सहाय्यता कार्यक्रम अशा ठिकाणांकडून घेण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये पुढे बँका आणि इतर संस्थांचीही मदत घेतली जाणार आहे. 

या संस्थांकडे तो व्यक्ती मृत असल्याची माहिती असली तरीही युआयडीएआयकडून वेगळी यंत्रणा राबवून त्याची पडताळणी केली जात आहे. यामुळे जिवंत असलेल्या व्यक्तीचे आधार रद्द होण्याची शक्यता टाळली जात आहे. याचबरोबर आधारच्या पोर्टलवरही एक सेवा सुरु करण्यात आली आहे. यामध्ये 'कुटुंबातील सदस्याच्या मृत्यूची नोंदणी' पर्याय देण्यात आला आहे. कुटुंबातील सदस्य स्वतः प्रमाणित करून मृत व्यक्तीचा आधार क्रमांक, मृत्यू नोंदणी क्रमांक आणि इतर आवश्यक तपशील पोर्टलवर देऊ शकतात. मृत्यूचे अधिकृत प्रमाणपत्र मिळाल्यानंतर या सुविधेचा वापर करून मृत व्यक्तीच्या आधार क्रमांकाची नोंदणी करावी, असे UIDAI ने आवाहन केले आहे.

महत्वाचे म्हणजे रद्द झालेला आधार क्रमांक गोठविला केला जातो, तो पुन्हा दुसऱ्या व्यक्तीला देण्यात येत नाही. यामुळे भविष्यात मृत व्यक्तीच्या माहितीचा गैरवापर होणार नाही. 

Web Title : यूआईडीएआई ने धोखाधड़ी रोकने के लिए 2 करोड़ आधार नंबर निष्क्रिय किए

Web Summary : यूआईडीएआई ने 2 करोड़ से अधिक मृत व्यक्तियों के आधार नंबर निष्क्रिय कर दिए। इसका उद्देश्य धोखाधड़ी और पहचान के दुरुपयोग को रोकना है। जानकारी रजिस्ट्रार, नागरिक पंजीकरण प्रणाली और अन्य सरकारी कार्यक्रमों से प्राप्त की जाती है। एक पोर्टल परिवारों को मौतों की रिपोर्ट करने में सक्षम बनाता है।

Web Title : UIDAI Deactivates 2 Crore Aadhaar Numbers to Prevent Fraud

Web Summary : UIDAI deactivated over 2 crore Aadhaar numbers of deceased individuals. This aims to curb fraud and misuse of identities. Information is sourced from Registrars, civil registration systems, and other government programs. A portal enables families to report deaths.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.