उदय कोटक यांनी समभाग विकले
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2020 04:39 IST2020-06-03T04:38:31+5:302020-06-03T04:39:17+5:30
समभाग विक्रीसाठी कोटक सिक्युरिटीज मॉर्गन स्टॅन्ले व गोल्डमन सॅक्स या कंपन्यांनी मध्यस्थांचे काम केले.

उदय कोटक यांनी समभाग विकले
विशेष प्रतिनिधी।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : विख्यात उद्योगपती उदय कोटक यांनी त्यांचे कोटक महिन्द्रा बँकेतील २.८० टक्के समभाग प्रायव्हेट प्लेसमेंट (खासगी सौद्याद्वारे) विकले आहे. रिझर्व्ह बँकेने खासगी बँकांच्या प्रवर्तकांना आपले भांडवल कमी करण्याचा आदेश दिल्यामुळे कोटक यांनी हे पाऊल उचलले आहे, अशी माहिती बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिली.
या समभाग विक्रीसाठी कोटक सिक्युरिटीज मॉर्गन स्टॅन्ले व गोल्डमन सॅक्स या कंपन्यांनी मध्यस्थांचे काम केले. कोटक महिन्द्रा बँकेच्या प्रत्येक शेअरसाठी १२१५ ते १२४० ही विक्री किंमत ठेवण्यात आली होती. या २.८० टक्के समभागातून ६८०० कोटी कोटक यांना मिळणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
रिझर्व्ह बँकेने खासगी बँकांच्या प्रवर्तकांनी आपले भांडवल तीन वर्षांत ४० टक्के,
दहा वर्षांत २० टक्के आणि १५ वर्षांत १५ टक्क्यांवर आणण्याचा आदेश दिला आहे. या समभाग विक्रीनंतर कोटक यांच्याकडे कोटक महिन्द्रा बँकेचे २६.१० टक्के भांडवल शिल्लक राहिले आहे.
त्यापैकी ०.१० टक्के भांडवल कोटक यांना सप्टेंबर २०२० पर्यंत विकून स्वत:चा मालकी हिस्सा २६ टक्के करायचा आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.