शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

Udaipur Murder Case: उदयपूर टेलर हत्याकांडानंतर गेहलोत सरकारवरील दबाव वाढला, घेतली अशी अ‍ॅक्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2022 06:54 IST

कन्हैया लाल यांच्या हत्येमुळे संपूर्ण देश हादरला आहे. अनेकजण या प्रकरणावर व्यक्त होताना दिसत आहेत.

मोहम्मद पैगंबर यांच्यासंदर्भात कथित आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट केल्यामुळे, उदयपूर येथील कन्हैया लाल नावाच्या एका टेलरची गळा कापून हत्या करण्यात आली. कन्हैया लाल यांच्या हत्येमुळे संपूर्ण देश हादरला आहे. अनेकजण या प्रकरणावर व्यक्त होताना दिसत आहेत. यामुळे, आता येथील काँग्रेसचे गेहलोत सरकार डॅमेज कंट्रोल मोडमध्ये आले आहे. याप्रकरणी शुक्रवारी अ‍ॅक्शन घेत उदयपूर अ‍ॅडिशनल एसपी अशोक कुमार मीणा यांना निलंबित करण्यात आले आहे. तर गुरुवारी रात्री उशिरा उदयपूर रेंजचे आयजी आणि एसएसपी यांची बदली करण्यात आली आहे.

उदयपूरचे अ‍ॅडिशनल एसपी निलंबित - राज्यातील गृह विभागाचे संयुक्त सचिव (पोलीस) जगवीर सिंह यांनी उदयपूरचे अ‍ॅडिशनल एसपी अशोक कुमार मीणा यांच्या निलंबनाचा  आदेश जारी केला आहे. मात्र, या आदेशात त्यांच्या निलंबनाचे कारण सांगण्यात आलेले नाही. मात्र, टेलर कन्हैयालाल साहू यांच्या हत्येप्रकरणात (Udaipur Tailor Murder Case) निष्काळजीपणामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली असल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्याचे एसएचओ आणि एएसआय यांना यापूर्वीच निलंबित करण्यात आले आहे. कन्हैया लाल साहू यांची मंगळवारी रात्रीच्या सुमारास 2 जिहाद्यांनी, दुकानात शिरून चाकूने गळाकापून हत्या केली होती.

दुकानापासून जवळपास 500 मीटर अंतरावर सापडली अ‍ॅक्टिव्हा -राजस्थान सरकारने स्थापन केलेल्या एसआयटीच्या तपासात मृत कन्हैया लाल साहू यांच्या दुकानापासून सुमारे 500 मीटर अंतरावर एक पांढऱ्या रंगाची अ‍ॅक्टिव्हा आढळून आली आहे. आरजे-२७-बीएस-१२२६, असा या अ‍ॅक्टिव्हा गाडीचा नंबर असल्याचे सांगण्यात येत आहे. गौस मोहम्मदच्या नावावर या अ‍ॅक्टिव्हाची नोंद आहे. हत्येतील आरोपी गौस मोहम्मद रियाज अत्तारी हा घटनेसाठी याच अ‍ॅक्टिव्हावर बसून आल्याचे बोलले जात आहे. 

राजस्थानातील अनेक शरहरांत आज बंदचे आवाहन - कन्हैयालाल यांच्या हत्येविरोधात देशभरात संतापाची लाट आहे. अनेक ठिकाणी निदर्शने सुरू आहेत. या हत्याकांडाच्या विरोधात आज राजस्थानमधील अनेक शहरांमध्ये बंद पुकारण्यात आला आहे. आज येथील किशनगड, अलवर, करौली, अजमेर आणि हिंडन शहरातील बाजारपेठा बंद राहतील. भाजपच्या आवाहनावरून या शहरांतील व्यापाऱ्यांनी बंदला पाठिंबा देत बंद पाळण्याचा निर्णय घेतला आहे. 

टॅग्स :Rajasthanराजस्थानTerrorismदहशतवादterroristदहशतवादीAshok Gahlotअशोक गहलोतcongressकाँग्रेस