शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

तृणमूलचे दोन आमदार भाजपमध्ये दाखल, तीन नगरपालिकांत सत्ता येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2019 04:11 IST

पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणुकांत भाजपला मिळालेले यश पाहून तृणमूल काँग्रेसच्या आमदारांत खळबळ माजल्याचे दिसत आहे.

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणुकांत भाजपला मिळालेले यश पाहून तृणमूल काँग्रेसच्या आमदारांत खळबळ माजल्याचे दिसत आहे. त्या पक्षातील अनेकांना भाजप हाच राज्यातील सर्वांत मोठा, महत्त्वाचा व प्रसंगी विधानसभा निवडणुकीद्वारे सत्ता मिळवू शकणारा पक्ष बनू शकेल, असे वाटू लागले आहे. त्यामुळेच तृणमूल काँग्रेसमध्ये गळती सुरू झाली आहे. त्याचाच भाग म्हणून तृणमूलच्या दोन आमदारांनी व ५० नगरसेवकांनी मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला.याशिवाय मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या एका आमदाराने भाजपमध्ये प्रवेश केला. इतके सारे नगरसेवक फुटल्याने पश्चिम बंगालधील तीन नगरपालिकांमध्ये आता भाजप सत्तेत येऊ शकेल. भाजपने या सर्व आमदार व नगरसेवकांना दिल्लीत आणून पक्षात प्रवेश दिला.भाजपचे सरचिटणीस व पश्चिम बंगालचे प्रभारी कैलाश विजयवर्गीय व राज्यातील महत्त्वाचे नेते मुकुल रॉय यांनी पत्रकार परिषदेत आमदार व नगरसेवकांच्या पक्षप्रवेशाची घोषणा केली. भाजपमध्ये प्रवेश केलेले बहुतांश नगरसेवक उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील आहेत. लोकसभा निवडणुकांत भाजपने १८ जागा जिंकून तृणमूल काँग्रेसला मोठा झटका दिला होता. त्यानंतर तृणमूल काँग्रेसला गळती लागली आहे.मुकुल रॉय हेही तृणमूल काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले नेते आहेत. आता त्यांचे पुत्र व तृणमूल काँग्रेसचे आमदार शुभ्रांशू रॉय (बिजापूर) यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्याबरोबरच याच पक्षाचे आणखी एक आमदार तुषारकांती भट्टाचार्य (विष्णुपूर) आणि हेमताबादचे माकपचे आमदार देवेंद्रनाथ रॉय यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तृणमूल काँग्रेसचे आणखी आमदार आमच्या संपर्कात आहेत, असा दावा भाजप नेत्यांनी या वेळी केला.पश्चिम बंगालमध्ये दोनवर्षांनी, २०२१ साली विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. तोपर्यंत तेथील पक्ष संघटना बळकट करण्याची तयारी भाजपने सुरू केली आहे. त्याचाच भाग म्हणून तृणमूल काँग्रेसमध्ये फूट पाडण्यात येतआहे. तृणमूलचे नेते व कार्यकर्तेच राज्य विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विजयासाठी खूप मदत करू शकतील, असे पक्षाच्या नेतृत्वाला वाटत आहे.>ममतांविषयी राग नाहीभाजपमध्ये आज प्रवेश केलेल्या एका नगरसेवकाला बाहेर पडण्याचे कारण विचारता तो म्हणाला की, आमचा ममता बॅनर्जी यांच्यावर राग नव्हता वा त्यांच्या कार्यपद्धतीविषयीही आमची तक्रार नव्हती.पण भाजप पश्चिम बंगालमध्ये ज्या पद्धतीने पुढे जात आहे, ते पाहून आपण प्रभावित झालो आहोत. त्यामुळेच आपण तृणमूल सोडून भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. बहुसंख्य तृणमूल नगरसेवकांचेही हेच म्हणणे दिसले. भाजपमध्ये गेल्यास आपल्यालाही पुढे जाण्याची संधी मिळेल, असे या नगरसेवकांना वाटत आहे.

टॅग्स :BJPभाजपा