दोन दहशतवाद्यांना घातले कंठस्नान, शोपीयानमध्ये शुक्रवारपासून चकमक सुरु
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2020 19:18 IST2020-12-26T19:17:13+5:302020-12-26T19:18:26+5:30
Encounter : कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी म्हणून मोबाईल, इंटरनेट सेवा खंडीत करण्यात आलेली आहे.

दोन दहशतवाद्यांना घातले कंठस्नान, शोपीयानमध्ये शुक्रवारपासून चकमक सुरु
दक्षिण काश्मीर भागातील शोपियान जिल्ह्यात शुक्रवार सायंकाळपासून सुरू झालेल्या चकमकीत आतापर्यंत दोन दहशवतवाद्यांना कंठस्नान घातले. तर दोन जवान जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. या परिसरात चकमक सुरू आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी म्हणून मोबाईल, इंटरनेट सेवा खंडीत करण्यात आलेली आहे.
Last night, we started an operation in Shopian on specific inputs. 2 Army Jawans were injured last night & were hospitalised. Both terrorists have been neutralised today. They belong to Al-Badr. Operation still underway. No casualty from our side: Dilbagh Singh, DG, J&K Police https://t.co/3CCBDwsyv6pic.twitter.com/A6f8RPPSx4
— ANI (@ANI) December 26, 2020
कनिगाम या गावात दहशतवादी लपून बसल्याची माहिती शुक्रवारी जवानांना मिळाली होती. त्यामुळे जवानांकडून परिसर घेरण्यात आला आणि शोधमोहीम सुरू झाली. दरम्यान, जवानांनी परिसर वेढल्याचे समजताच लपलेल्या दहशतवाद्यांकडून जवानांवर गोळीबार सुरू झाला. जवानांकडूनही चोख प्रत्युत्तर देण्यास सुरू झाल्याने दोघांत चकमक सुरू झाली. शुक्रवारी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन दहशतवादी पळ काढू नये म्हणून जवानांकडून परिसरात फ्लड लाईट्स देखील लावले गेले. रात्री चकमक सुरूच होती. त्यादरम्यान आज दुपारपर्यंत दोन दहशतवाद्यांचा खात्मा केल्याची माहिती काश्मीर झोनच्या पोलिसांकडून देण्यात आलेली आहे.
Jammu and Kashmir: An encounter has broken out at Kanigam area of Shopian. Police and security forces are carrying out the operation.
— ANI (@ANI) December 25, 2020
(Visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/K3b4eJmqXB