दिल्लीत घुसले दोन संशयित दहशतवादी? पोलिसांकडून पोस्टर जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2018 23:14 IST2018-11-20T23:11:45+5:302018-11-20T23:14:49+5:30

संपूर्ण दिल्लीत हाय अलर्ट जारी

Two suspected terrorists in Delhi? Poster issued by policedelhi police issues advisory against two suspected terrorists who likely to be entered in national capital | दिल्लीत घुसले दोन संशयित दहशतवादी? पोलिसांकडून पोस्टर जारी

दिल्लीत घुसले दोन संशयित दहशतवादी? पोलिसांकडून पोस्टर जारी

नवी दिल्ली : अमृतसरमध्ये स्फोट झाल्यानंतर आता राजधानी दिल्लीत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. दिल्लीत दोन संशयित दहशतवादी घुसल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या संशयित दहशतवाद्यांचं छायाचित्रदेखील दिल्ली पोलिसांनी प्रसिद्ध केलं आहे. हे दोघेही जैश-ए-मोहम्मदचे असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मोठा घातपात घडवण्यासाठी हे दहशतवादी दिल्लीत घुसल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. 

दिल्ली पोलीस सध्या दहशतवाद्यांचा कसून शोध घेत आहेत. अनेक गेस्ट हाऊस, हॉटेल्समध्ये जाऊन पोलीस दहशतवाद्यांचा शोध घेत आहेत. परदेशी नागरिक ज्या भागात येतात, त्या भागांची पोलिसांकडून तपासणी सुरू आहे. दिल्ली पोलिसांनी दहशतवाद्यांचं छायाचित्र प्रसिद्ध केलं आहे. या दहशतवाद्यांना पाहिल्यास त्यांची माहिती तातडीनं पोलिसांना देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. संशयित दहशतवाद्यांची छायाचित्रं दिल्लीत ठिकठिकाणी लावण्यात आली आहेत. या छायाचित्रात संशयित दहशतवादी एका दगडाजवळ उभे आहेत. यावर दिल्ली 360 किलोमीटर दूर असा मजकूर आहे. याशिवाय फिरोजपूर 9 किलोमीटर दूर असादेखील मजकूर आहे. यामुळे दिल्लीत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. 
 

Web Title: Two suspected terrorists in Delhi? Poster issued by policedelhi police issues advisory against two suspected terrorists who likely to be entered in national capital