उत्तर प्रदेशात दोन पोलिसांची हत्या

By Admin | Updated: June 17, 2014 00:23 IST2014-06-17T00:23:10+5:302014-06-17T00:23:10+5:30

उत्तर प्रदेशच्या फिरोजाबाद जिल्ह्णाच्या रामगड भागात अज्ञात चोरांनी पाठलाग करणाऱ्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांची रविवारी रात्री गोळ्या घालून हत्या केली़

Two policemen murdered in Uttar Pradesh | उत्तर प्रदेशात दोन पोलिसांची हत्या

उत्तर प्रदेशात दोन पोलिसांची हत्या

फिरोजाबाद/नवी दिल्ली : उत्तर प्रदेशच्या फिरोजाबाद जिल्ह्णाच्या रामगड भागात अज्ञात चोरांनी पाठलाग करणाऱ्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांची रविवारी रात्री गोळ्या घालून हत्या केली़ याप्रकरणी निष्काळजीपणा बाळगल्याचा ठपका ठेवून रामगड पोलीस ठाण्याचे प्रभारी अजय कुमार तसेच उपनिरीक्षक उमर फारुख या दोघांना निलंबित करण्यात आले आहे़
या घटनेनंतर आज सोमवारी हल्लेखोरांना अटक करण्याची मागणी करीत लोक रस्त्यावर उतरले़ यावेळी संतप्त जमावाने दगडफेक करीत अनेक दुकाने व वाहनांचे नुकसान केले़ रामगड ठाण्यात तैनात शिपाई दिनेश प्रताप सिंह (३२) व गिरीराज किशोर गुज्जर (३१) हे दोघे काल रविवारी रात्री गस्तीवर होते़ या ठिकाणी काही गुंडांनी लुटमार केली़ पीडित व्यक्ती या लुटमारीची तक्रार घेऊन गस्तीवरील या शिपायांकडे आला़ दोन्ही शिपायांनी पीडिताने दिलेल्या माहितीच्या आधारावर गुंडांचा पाठलाग केला़ (वृत्तसंस्था)
 

Web Title: Two policemen murdered in Uttar Pradesh