देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 09:17 IST2025-12-25T06:32:59+5:302025-12-25T09:17:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : भारतीय हवाई वाहतूक क्षेत्रात नव्या विमान कंपन्यांचा प्रवेश होत असून, हिंद एअर व ...

देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : भारतीय हवाई वाहतूक क्षेत्रात नव्या विमान कंपन्यांचा प्रवेश होत असून, हिंद एअर व फ्लाईएक्स्प्रेस या दोन विमान कंपन्यांना उड्डाणासाठी नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाकडून एनओसी मिळाली आहे. त्यामुळे या कंपन्या लवकरच प्रत्यक्ष विमानसेवा सुरू करण्याच्या तयारीत आहेत. यापूर्वी उत्तर प्रदेशस्थित शंख एअरलाही एनओसी देण्यात आली आहे.
सध्या कार्यरत विमान कंपन्या
एअर इंडिया I एअर इंडिया एक्स्प्रेस I इंडिगो I अलायन्स एअर (सार्वजनिक क्षेत्र) I अकासा एअर I स्पाइसजेट I स्टार एअर I फ्लाई९१ I इंडियावन एअर
९०%+ इंडिगो व एअर इंडिया समूहाचा वाटा
‘उडान’ योजनेमुळे स्टार एअर, इंडिया वन एअर, फ्लाई९१ यांसारख्या छोट्या विमान कंपन्यांना प्रादेशिक हवाई संपर्क मजबूत करण्यात महत्त्वाची
भूमिका बजावता आली आहे. भविष्यात या क्षेत्रात मोठी वाढ होण्याची क्षमता आहे.
- के.राममोहन नायडू, नागरी हवाई वाहतूकमंत्री
प्रवाशांसाठी फायदेशीर
देशांतर्गत विमान प्रवास क्षेत्रात सध्या इंडिगो, एअर इंडिया समूह या दोन कंपन्यांचे वर्चस्व आहे. यांचा मिळून ९० टक्क्यांहून अधिक वाटा आहे. अशा परिस्थितीत नव्या कंपन्यांचा प्रवेश स्पर्धा वाढवणारा आणि प्रवाशांसाठी फायदेशीर ठरण्याची अपेक्षा आहे.
अधिक कंपन्यांना चालना
भारतात अधिक विमान कंपन्या कार्यरत व्हाव्यात, यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. सध्या देशात नऊ विमान कंपन्या नियमित देशांतर्गत
सेवा देत आहेत.