शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
2
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
3
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
4
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
5
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
6
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
7
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
8
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
9
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
10
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
11
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
12
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
13
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
14
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
15
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
16
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
17
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
18
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
19
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
20
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला

एकाच वेळी कोसळली दोन लढाऊ विमाने, एका पायलटचा मृत्यू, मध्य प्रदेशातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2023 07:43 IST

Two fighter jets crash : भारतीय हवाई दलाच्या दोन आघाडीच्या लढाऊ विमानांचा शनिवारी मध्य प्रदेशातील मुरैना जिल्ह्यात प्रशिक्षण मोहिमेदरम्यान अपघात झाला. यात विंग कमांडरचा मृत्यू झाला. तर, दोन पायलट सुखरूप बाहेर पडले. 

नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाच्या दोन आघाडीच्या लढाऊ विमानांचा शनिवारी मध्य प्रदेशातील मुरैना जिल्ह्यात प्रशिक्षण मोहिमेदरम्यान अपघात झाला. यात विंग कमांडरचा मृत्यू झाला. तर, दोन पायलट सुखरूप बाहेर पडले. संरक्षणतज्ज्ञांनी सांगितले की, रशियन-डिझाइन केलेले सुखोई-३० एमकेआय जेट आणि फ्रेंच मिराज-२००० ची हवेत टक्कर झाली असण्याची शक्यता आहे. परंतु हवाई दलाने याबद्दल कोणतीही अधिकृत टिप्पणी केलेली नाही. हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही.आर. चौधरी यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना अपघाताची माहिती दिली. हनुमंत राव सारथी यांच्या निधनाबद्दल राजनाथ सिंह यांनी दु:ख व्यक्त केले.

पाच वर्षांत अपघातांत ४२ जवानांचा मृत्यूगेल्या वर्षी मार्चमध्ये संरक्षण राज्यमंत्री अजय भट यांनी राज्यसभेत सांगितले होते की, गेल्या पाच वर्षांत तिन्ही सेवांच्या विमान आणि हेलिकॉप्टरच्या अपघातांत ४२ जवानांचा मृत्यू झाला आहे.   

राजस्थानात सैन्याचे विमान कोसळलेnभरतपूर : राजस्थानच्या भरतपूरमध्ये सैन्याचे एक विमान कोसळले. पिंगोरा रेल्वे स्थानकाजवळ चक नगला बीजा गावाजवळ ही दुर्घटना घडली. मोकळ्या जागेत हे विमान कोसळल्याचे भरतपूरचे पोलिस अधीक्षक श्याम सिंह यांनी सांगितले.nस्थानिक पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि लोकांना येथून हटविले. स्थानिकांनी सांगितले की, अगोदर विमानाला आग लागली व नंतर कोसळले. 

दोन पायलट सुखरूपमिराज विमानाच्या मृत वैमानिकाचे नाव विंग कमांडर हनुमंत राव सारथी असे आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, अपघाताच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. सुखरूप बाहेर पडलेल्या दोन पायलटना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

टॅग्स :airplaneविमानindian air forceभारतीय हवाई दल