दोन सिलेंडर, काही घरांमध्ये PNG कनेक्शन, मग संपूर्ण भारतात किती आहे एलपीजी सिलेंडर?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 15:55 IST2026-03-11T15:54:25+5:302026-03-11T15:55:10+5:30
परदेशातून येणार्या गॅसच्या आयातीत घट झाल्याने टंचाई निर्माण झाली आहे. देशात गेल्या काही वर्षात स्वयंपाकासाठी गॅस वापरणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढली आहे.

दोन सिलेंडर, काही घरांमध्ये PNG कनेक्शन, मग संपूर्ण भारतात किती आहे एलपीजी सिलेंडर?
भारतात गॅस वापरणाऱ्यांची संख्या किती आहे, असा प्रश्न देशात निर्माण झालेल्या गॅस टंचाईनंतर चर्चेत आला आहे. १४० कोटी लोकसंख्या असणाऱ्या भारतात तेल आणि गॅस यांची गरज जास्त आयाती करूनच भागवली जाते. गॅस तर थेट स्वयंपाक घराशी जोडलेला असल्याने युद्धाचा परिणाम प्रकर्षाने जाणवू लागला आहे.
केंद्र सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानुसार, देशात ३३ कोटी एलपीजी कनेक्शन आहेत. यातील बहुतांश घरांमध्ये दोन सिलेंडर आहेत. याच प्रमाणाने विचार केला तर देशातील सिलेंडरची संख्या ६६ कोटीपर्यंत असू शकते.
यात पंतप्रधान उज्ज्वला योजनेतंर्गत देण्यात आलेल्या गॅस कनेक्शनचाही समावेश आहे. त्यामुळे ग्रामीण भागात गॅस वापरणाऱ्या कुटुंबांची संख्या वाढली. त्याचबरोबर देशात व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडरची संख्याही प्रचंड आहे.
सरकारच्या आकडेवारीनुसार, देशात १०१४ मध्ये एलपीजी कनेक्शनची संख्या १४.५ कोटी इतकी होती. मागील दहा वर्षांमध्ये ही संख्या दुप्पट म्हणजे ३३ कोटीपर्यंत पोहोचली आहे. पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेतंर्गत १०.४ कोटी गरीब कुटुंबांकडे एलपीजी कनेक्शन आहेत.
शहरांमध्ये पाईपद्वारे गॅस पुरवठा गेला जातो. पीएनजी कनेक्शनची संख्याही हळूहळू वाढू लागली आहे. सरकारी आकडेवारीनुसार, सध्या देशात १.५ कोटी पीएनजी कनेक्शन आहेत. ही सुविधा सध्या महानगरांमध्येच आहे.