Video - दिल्लीमध्ये सोनसाखळी चोरांचा हैदोस

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2018 11:15 IST2018-11-03T10:47:32+5:302018-11-03T11:15:54+5:30

चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असतानाच दिल्लीमध्ये सोनसाखळी चोरांचा हैदोस पाहायला मिळाला. दिल्लीच्या दयालपूरमध्ये सोनसाखळी चोरांनी चाकूचा धाक दाखवत चोरी केल्याची घटना समोर आली आहे.

Two bike-borne men rob a woman at knifepoint in Delhi's Dayalpur | Video - दिल्लीमध्ये सोनसाखळी चोरांचा हैदोस

Video - दिल्लीमध्ये सोनसाखळी चोरांचा हैदोस

नवी दिल्ली - चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असतानाच दिल्लीमध्ये सोनसाखळी चोरांचा हैदोस पाहायला मिळाला. दिल्लीच्या दयालपूरमध्ये सोनसाखळी चोरांनी चाकूचा धाक दाखवत चोरी केल्याची घटना समोर आली आहे. बाईकवरून आलेल्या दोन चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरल्याची घटना घडली. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.


दिल्लीच्या दयालपूरमध्ये एक महिला तिच्या लहान मुलासोबत जात असताना बाईक वरून आलेल्या दोन तरूणांनी तिच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यानंतर चाकूचा धाक दाखवून ती साखळी घेऊन ते पसार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मात्र या दोन्ही सोनसाखळी चोरांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. तसेच चोरांनी हिसकावलेली सोनसाखळी पोलिसांनी जप्त केली आहे. 
 

Web Title: Two bike-borne men rob a woman at knifepoint in Delhi's Dayalpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.