पान १ वेर्णा येथे दोन अपघात एक जागीच ठार, दोघे जखमी

By Admin | Updated: May 5, 2015 01:20 IST2015-05-05T01:20:51+5:302015-05-05T01:20:51+5:30

वास्को : वेर्णा पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी रात्री आणि सोमवारी संध्याकाळी झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात एक मोटारसायकलस्वार जागीच ठार झाला. दोन वाहनांच्या समोरासमोर झालेल्या टक्करीत दोनही वाहनचालक गंभीर जखमी झाले.

Two of the accidents were on the spot in Venna and two injured | पान १ वेर्णा येथे दोन अपघात एक जागीच ठार, दोघे जखमी

पान १ वेर्णा येथे दोन अपघात एक जागीच ठार, दोघे जखमी

स्को : वेर्णा पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी रात्री आणि सोमवारी संध्याकाळी झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात एक मोटारसायकलस्वार जागीच ठार झाला. दोन वाहनांच्या समोरासमोर झालेल्या टक्करीत दोनही वाहनचालक गंभीर जखमी झाले.
वेर्णा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार रविवारी रात्री ११़०० वाजण्याच्या दरम्यान प्रसाद तुकाराम गोगटे (मूळ रा. सावंतवाडी) मोटारसायकलवरून (एमएच -०७/आर - ७७०२ ) मडगावला जात असता वेर्णा येथे त्याला टेम्पोने (जीए - ०३/के - २५४३) जोरदार धडक दिली. धडकेत तो रस्त्यावर फे कला गेला आणि जागीच ठार झाला. टेम्पोचालक तिरूपती आऊथकानाल याने एका वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नाने हा अपघात घडला़ वेर्णा पोलिसांनी टेम्पोचालकास अटक केली आहे.
दुसरा अपघातही वेर्णा महामार्गावरच संध्याकाळी ५़०० वाजण्याच्या दरम्यान झाला. टेम्पो (जीए- ०८/झेड - ६७७७) मडगावहून कुठ्ठाळी आणि मोटार (आय - १० क्र जीए - ०८/ के - ४१२५) ही वेर्णाहून मडगावच्या दिशेने जात असता त्यांची समोरासमोर टक्कर झाली़ त्यामुळे टेम्पोचालक आणि कारचालक यांच्यासह इतर तिघेजण किरकोळ जखमी झाले़
१०८ रुग्णवाहिकेने जखमी झालेल्या दोन्ही वाहनचालकांना, तसेच वाहनातील व्यक्तींना बांबोळीच्या गोवा वैद्यकीय महाविद्यालय हॉस्पिटलात दाखल केले. उशिरापर्यंत जखमींची नावे पोलिसांकडून मिळू शकली नाहीत.
(प्रतिनिधी)
फोटो आहे : ०४०५ वीएएस ०७

Web Title: Two of the accidents were on the spot in Venna and two injured