तांत्रिक बिघाडामुळे ट्विटरची सेवा पाऊणतास ठप्प
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2018 20:13 IST2018-04-17T20:02:10+5:302018-04-17T20:13:48+5:30
संध्याकाळी साधारण साडे सातच्या सुमारास ही बाब अनेकांच्या लक्षात आली.

तांत्रिक बिघाडामुळे ट्विटरची सेवा पाऊणतास ठप्प
मुंबई: सोशल मीडियावरील लोकप्रिय व्यासपीठ असलेल्या ट्विटरची सेवा मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास ठप्प झाली. त्यामुळे ट्विटरवर लॉग इन करायला गेल्यास तांत्रिक बिघाड असल्याचा संदेश पाहायला मिळत होता. संध्याकाळी साधारण साडेसातच्या सुमारास ही बाब अनेकांच्या लक्षात आली. यापूर्वीही तांत्रिक बिघाडामुळे ट्विटर सेवा ठप्प होण्याचे प्रकार घडले होते.