जम्मू-काश्मीरबद्दल ट्विटरने केला खुलासा, दाखवला होता चीनचा भूभाग

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2020 03:49 AM2020-10-20T03:49:31+5:302020-10-20T03:50:14+5:30

ट्विटरच्या प्रवक्त्याने अधिकृत निवेदनात म्हटले की, ‘या तांत्रिक विषयाची रविवारी जाणीव झाली व त्याबाबतच्या संवेदनशीलता समजल्या. चौकशी करून संबंधित जिओटॅग मुद्दा सोडविण्यासाठी टिम्सनी वेगाने काम केले.’

Twitter clarification about Jammu and Kashmir shows Chinese territory | जम्मू-काश्मीरबद्दल ट्विटरने केला खुलासा, दाखवला होता चीनचा भूभाग

जम्मू-काश्मीरबद्दल ट्विटरने केला खुलासा, दाखवला होता चीनचा भूभाग

Next

नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीर हा चीनचा भूभाग दाखवला गेल्यानंतर समाजमाध्यमांत वादळ उठल्यावर सोमवारी दुसºया दिवशी ट्विटरने तो प्रकार ‘तांत्रिक मुद्दा’ असे म्हणून तो प्रश्न आता सोडवला आहे, असे म्हटले. ट्विटरने खुलाशात जोर देऊन म्हटले की, ‘त्या विषयाभोवती असलेल्या संवेदनशीलतांचा ‘सन्मान’ राखतो आणि त्याबाबत अंतर्गत चौकशी सुरू केली आहे.’

ट्विटरच्या प्रवक्त्याने अधिकृत निवेदनात म्हटले की, ‘या तांत्रिक विषयाची रविवारी जाणीव झाली व त्याबाबतच्या संवेदनशीलता समजल्या. चौकशी करून संबंधित जिओटॅग मुद्दा सोडविण्यासाठी टिम्सनी वेगाने काम केले.’
 
Web Title: Twitter clarification about Jammu and Kashmir shows Chinese territory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.