खेळता-खेळता इमारतीच्या 25व्या मजल्यावरून खाली पडून जुळ्या भावांचा दुर्दैवी मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2021 12:33 IST2021-10-17T12:33:27+5:302021-10-17T12:33:47+5:30

पोलिसांनी घटनास्थळी पोहचून दोघांचे मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवले.

twin brothers died on the spot after falling from the 25th floor of the building in gaziabad | खेळता-खेळता इमारतीच्या 25व्या मजल्यावरून खाली पडून जुळ्या भावांचा दुर्दैवी मृत्यू

खेळता-खेळता इमारतीच्या 25व्या मजल्यावरून खाली पडून जुळ्या भावांचा दुर्दैवी मृत्यू

नवी दिल्ली: गाझियाबादमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील विजय नगरमध्ये एका इमारतीच्या 25व्या मजल्यावरून पडून दोन जुळ्या भावांचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहचून दोघांचे मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवले. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. 16-17 ऑक्टोबरच्या रात्री एकच्या सुमारास ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, गाझियाबादच्या विजयनगर पोलीस स्टेशन परिसरातील सिद्धार्थ विहारच्या एका सोसायटीमध्ये 25 व्या मजल्यावर एक कुटुंब राहते. 25 व्या मजल्यावर राहणाऱ्या या कुटुंबातील 14 वर्षीय सूर्य नारायण आणि सत्य नारायण मध्यरात्री फ्लॅटच्या बाल्कनीमध्ये खेळत होते. खेळत असताना अचानक दोन्ही भाऊ बाल्कनीतून खाली पडले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघाताच्या वेळी मुलांची आई आणि बहीण होते तर वडील कामानिमित्ताने मुंबईला गेले होते. रात्री 12 वाजल्यानंतर घरातील सर्वजण झोपायला गेले, त्यानंतर काय झालं? दोन्ही भाऊ रेलिंग ओलांडून कसे पोहोचले आणि अपघात कसा झाला ? हे शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. या घटनेबाबत मृताच्या आईची चौकशी करण्यात आल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. 

Web Title: twin brothers died on the spot after falling from the 25th floor of the building in gaziabad