बोगद्यातील दुर्घटना : आणखी आठ मजुरांचे मृतदेह मिळाले
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2022 08:35 IST2022-05-22T08:35:00+5:302022-05-22T08:35:19+5:30
बोगद्याच्या ठिकाणी ढिगाऱ्याखाली ९ मजूर दबले असल्याची शक्यता होती

बोगद्यातील दुर्घटना : आणखी आठ मजुरांचे मृतदेह मिळाले
बनिहाल : जम्मू - काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात जम्मू- श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर एका बोगद्याचे काम सुरु असताना त्याचा एक भाग ढासळला. या ठिकाणाहून शनिवारी आणखी आठ मजुरांचे मृतदेह काढण्यात आले. त्यामुळे मृतांची संख्या ९ झाली आहे. तर, अन्य १ जणांचा शोध सुरु
आहे.
बोगद्याच्या ठिकाणी ढिगाऱ्याखाली ९ मजूर दबले असल्याची शक्यता होती. येथे भूस्खलन झाल्याने शुक्रवारी सायंकाळी मदत कार्य थांबविण्यात आले होते. अधिकाऱ्यांनी सांगितले की, शुक्रवारी सायंकाळी मदत कार्य सुरु असताना भूस्खलन झाले. यावेळी पोलीस ठाण्याचे प्रभारी नईमुल हक यांच्यासह १५ जण थोडक्यात बचावले.