शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

'त्यांना जिवंत पकडा'; काश्मीरमध्ये सुरक्षा दलांची नवी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2018 18:56 IST

दहशतवाद्याच्या टॉप कमांडर्सला ठार केल्यानंतर सुरक्षा दलांची नवी मोहीम

श्रीनगर: जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधातील रणनितीत मोठा बदल पाहायला मिळणार आहे. गेल्या सात महिन्यांमध्ये 70 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सुरक्षा दलांनी आता 'त्यांना जिवंत पकडा,' अशी घोषणा दिली आहे. दहशतवादी संघटनांमध्ये सहभागी होणाऱ्या तरुणांना पकडून त्यांना त्यांच्या कुटुंबाकडे पाठवण्यासाठी सुरक्षा दलांनी रणनितीत मोठा बदल केला आहे. याआधी दहशतवाद्यांच्या म्होरक्यांना संपवण्यासाठी सुरक्षा दलांनी जम्मू काश्मीरमध्ये 'ऑपरेशन ऑल आऊट' राबवलं होतं.  दहशतवाद्यांचं नेटवर्क उद्ध्वस्त करण्याच्या उद्देशानं रणनितीत बदल करण्यात आल्याची माहिती सुरक्षा दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. 'अनेक तरुणांना जिहाद करण्यासाठी प्रवृत्त केलं जातं. हे तरुण दहशतवाद्यांकडून केल्या जाणाऱ्या ब्रेन वॉशिंगचे बळी ठरतात. त्यांना जिवंत पकडून त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा आमचा प्रयत्न असेल,' अशी माहिती दहशतवादविरोधी कारवायांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या एका अधिकाऱ्यानं दिली. पंधरा-सोळा वर्षांच्या तरुणांचं ब्रेनवॉशिंग केलं जातं. याची तीव्रता इतकी जास्त असते की, हे तरुण मरायला तयार होतात. या सगळ्या गोष्टींची कारणमिमांसा होणं गरजेचं आहे, असंही ते म्हणाले. 'गेल्या काही दिवसांमध्ये दहशतवाद्यांच्या अनेक टॉप कमांडर्सचा खात्मा करण्यात आला आहे. हेच कमांडर्स लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिद्दीन यांच्यासारख्या संघटनांमध्ये तरुणांची भरती करत होते. तरुणांना दहशतवादी मार्गाकडे नेण्यात कमांडर्सची भूमिका महत्त्वाची होती. त्यांचा खात्मा करण्यात आल्यामुळे आता सुरक्षा दलांनी पवित्रा बदलला', अशी माहिती अधिकाऱ्यानं दिली.  

टॅग्स :terroristदहशतवादीTerrorismदहशतवादTerror Attackदहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीर