शहरं
Join us  
Trending Stories
1
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
2
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
3
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
4
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
5
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
6
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
7
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
8
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
9
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
10
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
11
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
12
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
13
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
14
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
15
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
16
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
17
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
18
म्हशीला रेबीज, ३० जणांना टोचावे लागले इंजेक्शन! प्रकरण ऐकाल तर हादरून जाल
19
उन्हाळ्यात किचनमध्ये काम करताना नुसत्या घामाच्या धारा; 'असं' ठेवा स्वत:ला थंड थंड कूल कूल
20
अर्जुन तेंडुलकर आणि वैभव सूर्यवंशी यांच्यातील फिल्डबाहेरची खास गोष्ट; कमाईच्या बाबतीत कोण भारी?
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकचालकाला लुटणारा अटकेत

By admin | Updated: February 14, 2015 23:52 IST

पुणे : मुंबई-बेंगलोर महामार्गावर पुनावळे येथे रात्रीच्या वेळी ट्रक उभी करून ट्रकचालक झोपला असता, त्याला सुरीचा धाक दाखवून ११ हजारांच्या रोकड व मोबाइल हिसकावून नेणार्‍या दोघांना हिंजवडी पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्यांना १६ फेब्रुवारीपयंर्त पोलीस कोठडी सुनावली आहे.

पुणे : मुंबई-बेंगलोर महामार्गावर पुनावळे येथे रात्रीच्या वेळी ट्रक उभी करून ट्रकचालक झोपला असता, त्याला सुरीचा धाक दाखवून ११ हजारांच्या रोकड व मोबाइल हिसकावून नेणार्‍या दोघांना हिंजवडी पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्यांना १६ फेब्रुवारीपयंर्त पोलीस कोठडी सुनावली आहे.
कमलाकांत ऊर्फ राजू सोमनाथ नांगडे (वय २१, रा. शिंदे वस्ती, रावेत, मूळ रा. भुवनेश्वर, उडिसा) आणि ज्ञानेश्वर ऊर्फ माउली विठ्ठल ढवल (वय २०, रा. शिंदे वस्ती, रावेत, मूळ रा. बीड) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी ट्रकचालक सुधाकर वसंत ढगे (वय ३६, रा. जिजामाता कॉलनी, अभय नगर, सांगली) यांनी फिर्याद दिली आहे.
ढगे यांनी त्यांच्या ट्रकमध्ये ६ फेब्रुवारीला अहमदाबाद येथील रेणुका ट्रान्सपोर्ट या ठिकाणावरून पार्सल माल भरला आणि हुबळी, कर्नाटक येथे घेऊन जाण्यासाठी ते मुंबई-बेंगलोर या मागार्ने प्रवास करत होते. ८ फेब्रुवारी रोजी (रविवारी) रात्री त्यांनी मुंबई-बेंगलोर महामार्गावरील पुनावळे गावच्या हद्दीत ताज हॉटेलशेजारी ट्रक उभी केली आणि ट्रकचे दोन्ही दरवाजे आतून लावून घेऊन झोपले होते.
रात्री सव्वातीनच्या सुमारास त्यांच्या ट्रकचा दरवाजा आरोपींनी वाजवला. आरोपी हे त्यांच्या ट्रकच्या केबिनमध्ये शिरले आणि त्यांनी चालक ढगे यांना सुरीचा धाक दाखवून साडेअकरा हजार रुपये आणि मोबाइल जबरदस्तीने घेऊन त्यांच्या दुचाकीवरून फरार झाले. आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांच्याकडून रोख रक्कम हस्तगत करण्यासाठी व गुन्‘ात आणखी कोणी साथीदार आहेत का, याचा तपास करण्यासाठी सरकारी वकील ए. के. पाचारणे यांनी त्यांच्या पोलीस कोठडीची मागणी केली.