भीषण अपघात! लग्नाच्या वऱ्हाडाचा ट्रक नाल्यात कोसळून 26 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2018 10:36 IST2018-03-06T10:28:28+5:302018-03-06T10:36:42+5:30

मंगळवारी सकाळी एक ट्रक नाल्यात कोसळून झालेल्या अपघातात 25 जणांचा मृत्यू झाला. भावनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. या ट्रकमध्ये वऱ्हाडी मंडळी होती. 

Truck falls into drain in Bhavnagar, 25 killed | भीषण अपघात! लग्नाच्या वऱ्हाडाचा ट्रक नाल्यात कोसळून 26 जणांचा मृत्यू

भीषण अपघात! लग्नाच्या वऱ्हाडाचा ट्रक नाल्यात कोसळून 26 जणांचा मृत्यू

भावनगर - गुजरातच्या भावनगर जिल्ह्यात भीषण अपघात झाला आहे. मंगळवारी सकाळी एक ट्रक नाल्यात कोसळून झालेल्या अपघातात 25 जणांचा मृत्यू झाला. भावनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. या ट्रकमध्ये वऱ्हाडी मंडळी होती. 

भावनगर-राजकोट महामार्गावर उमरालाजवळ हा ट्रक पलटी होऊन नाल्यात कोसळला. या ट्रकमध्ये जवळपास 60 माणसे होती. हाती आलेल्या प्राथमिक माहितीनुसार या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये महिला आणि मुलांची संख्या जास्त आहे. लोकांना बाहेर काढण्यासाठी बचाव पथकांनी क्रेनची मदत घेतली असून अग्निशमन दलही बचाव मोहिमेत सहभागी झाले आहे. 



 

Web Title: Truck falls into drain in Bhavnagar, 25 killed

टॅग्स :Accidentअपघात