लग्नावरून येताना घात, ३ भावांसह ९ मित्र ठार; चहाला थांबले असते तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2024 06:34 IST2024-04-22T06:34:05+5:302024-04-22T06:34:27+5:30

ट्रकमध्ये अडकलेल्या कारचा चेंदामेंदा

Truck crushes car in Rajasthan's Jhalawar district, 9 killed on the spot | लग्नावरून येताना घात, ३ भावांसह ९ मित्र ठार; चहाला थांबले असते तर...

लग्नावरून येताना घात, ३ भावांसह ९ मित्र ठार; चहाला थांबले असते तर...

कोटा : लग्न समारंभ आटोपून परतणाऱ्या नऊ मित्रांची कार समोरून येणाऱ्या ट्रकला धडकल्याने सर्वांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना राजस्थानच्या झालावाड जिल्ह्यात शनिवारी रात्री उशिरा घडली. पोलिसांनी या घटनेची  माहिती दिली. मृत सर्व जण भोपाळच्या डुंगरी गावात आयोजित एका लग्न समारंभावरून माघारी येत होते. या अपघातात मृत्यू झालेले सर्व जण १६ ते ३० वयोगटातील आहेत.

एकलेरा पोलिस स्टेशनचे प्रभारी संदीप विशोनी यांनी सांगितले की, मृतांमध्ये १६ वर्षीय रोहित, २२ वर्षीय सोनू आणि २४ वर्षीय दीपक यांचा समावेश आहे. हे तिघे भाऊ असल्याचे त्यांनी सांगितले. १८ वर्षीय मनीष बागरी याची प्रकृती चिंताजनक असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तीन भावांसह नऊ जणांची एकाच वेळी अंत्ययात्रा काढण्यात आली. त्यावेळी कुटुंबियांनी एकच आक्रोश केला.

चहाला थांबले असते तर...
अपघातात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गोपाल बागरी यांनी सांगितले की, रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास लग्नाचे ३५-४० पाहुणे तीन कार आणि दोन पिकअप वाहनांतून डुंगरीहून निघाले होते. वाटेत ते चहा प्यायला थांबले; पण दुसरी गाडी पुढे गेली.  १० मिनिटांनंतर त्यांना पाचोळा गावाजवळ खराब अवस्थेत ट्रकमध्ये अडकलेली कार दिसली. गंभीर जखमींना बाहेर काढण्यासाठी गाडीचा मागचा दरवाजा तोडावा लागला.

Web Title: Truck crushes car in Rajasthan's Jhalawar district, 9 killed on the spot

टॅग्स :Accidentअपघात