सासरा- जावयाच्या कुटुंबात तुंबळ हाणामारी
By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:27+5:302015-02-18T00:13:27+5:30
पंधरा जखमी : घरगुती वादाचे कारण

सासरा- जावयाच्या कुटुंबात तुंबळ हाणामारी
प धरा जखमी : घरगुती वादाचे कारणऔरंगाबाद : किरकोळ घरगुती वादातून सासरा-जावयाच्या कुटुंबात तलवार, लाठ्या-काठ्या व लोखंडी सळईने तुंबळ हाणामारी झाली. त्यात दोन्ही कुटुंबांमधील १५ जण जखमी झाले. ही घटना सोमवारी मध्यरात्री गारखेडा परिसरात घडली. घटनेबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, गारखेडा गावातील शेख गफार शेख कम्मू यांचा जावई शेख बुर्हाण शेख हसन हा बाजूलाच राहतो. बुर्हाणचे पत्नीसोबत घरगुती कारणावरून भांडण झाले होते. सोमवारी सासरा शेख गफारने घरी जाऊन जावई बुर्हाणची समजूत घातली. मात्र, त्यातून दोघांमधील वाद अधिक वाढला. शेवटी शेख गफार घरी निघून आले. मग रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास जावई बुर्हाण हा आपल्या आठ-दहा नातेवाईकांसह तलवार, लाठ्या-काठ्या घेऊन सासर्याच्या घरी आला आणि त्याने हल्ला चढविला. तेव्हा गफार यांची मुले, भाऊ, भाच्यांनीही त्यांना जशास तसे प्रत्त्युतर दिले. दोन्ही गटांत बराच वेळ तुंबळ हाणामारी झाली. त्यात सासरा शेख गफारसह त्याचा मुलगा अल्ताफ, शेख अक्रम, भाचा शेख नजीम शेख मुसा, अन्सार शेख जब्बार, शेख सलीम शेख इसाक, मुलगी खुर्शिदा शेख गफूर यांच्यासह जावई शेख बुर्हाण, शेख रशीद शेख हसन, सलिमाबी हारुण, शेख अलीम शेख हसन, शेख शकील शेख हसन, शेख हसन शेख इब्राहीम, शेख रफीक शेख हसन असे दोन्ही गटांचे एकूण १५ जण गंभीर जखमी झाले. सर्व जखमी घाटीत उपचारासाठी दाखल झाले आहेत. दरम्यान, या मारहाणप्रकरणी सासरा शेख गफार यांच्या फिर्यादीवरून जावूशेख बुर्हाण व त्याच्या साथीदारांविरुद्ध मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. पोलीस निरीक्षक उत्तम मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार व्ही.जी. साळुंके अधिक तपास करीत आहेत.