शहरं
Join us  
Trending Stories
1
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
2
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
3
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
4
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
5
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
6
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
7
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
8
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
9
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
10
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
11
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
12
...जेव्हा मगरीने भरलेल्या तुडुंब नदीत आईनेच मुलाला फेकून दिले
13
सरकारच्या अनुदानामुळे १५ लाख ईव्हींची विक्री; फेम-२ योजनेतील ९० टक्के निधीचा पाच वर्षांत विनियोग
14
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
15
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

अति घाई नडली! त्रिपुराच्या राज्यपालांची आधी वाजपेयींना श्रद्धांजली; मग माफी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2018 3:20 PM

नेटिझन्सच्या टीकेनंतर श्रद्धांजलीचं ट्विट डिलीट

अगरताळा: माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची प्रकृती अतिशय गंभीर आहे. त्यांच्यावर दिल्लीतीलएम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वाजपेयी यांच्या प्रकृतीत कालपासून सुधारणा होत नसल्याचं एम्सनं मेडिकल बुलेटिनच्या माध्यमातून सांगितलं आहे. वाजपेयी यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी देशभरात प्रार्थना सुरू असताना त्रिपुराचे राज्यपाल तथागत रॉय यांना ट्विट करुन श्रद्धांजली वाहिली. मात्र काही वेळातच रॉय यांना त्यांच्या चुकीची जाणीव झाली आणि मग त्यांनी ट्विट डिलीट करुन माफी मागितली. तथागत रॉय यांनी ट्विट करुन अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं. 'भारताचे माजी पंतप्रधान, उत्तम वक्ते आणि सहा दशकांपासून राजकीय क्षितिजावर चमकणारे, डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांचे खासगी सचिव म्हणून कारकिर्दीची सुरुवात करणारे, अतिशय बुद्धिमान आणि विनम्र असणारे अटल बिहारी वाजपेयी यांचं निधन झालं आहे. ओम शांती,' असं ट्विट रॉय यांनी केलं होतं. यानंतर नेटिझन्सनी रॉय यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली. 

नेटिझन्सच्या प्रतिक्रिया येऊ लागल्यानंतर राज्यपाल रॉय यांना त्यांना चुकीची जाणीव झाली. यानंतर रॉय यांनी पुन्हा ट्विट केलं आणि माफी मागितली. 'मला माफ करा. टीव्हीवरील वृत्त पाहून मी ट्विट केलं होतं. अद्याप याबद्दलची कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. मी माझं आधीचं ट्विट डिलीट केलं आहे. मला पुन्हा एकदा माफ करा,' असं रॉय यांनी ट्विटमध्ये म्हटलं.  

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटल बिहारी वाजपेयीAIIMS hospitalएम्स रुग्णालयdelhiदिल्लीBJPभाजपा