तिहेरी तलाक विधेयक आज राज्यसभेत; मोदी सरकारची अग्निपरीक्षा 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2019 09:58 AM2019-07-30T09:58:26+5:302019-07-30T09:59:00+5:30

राज्यसभेत बहुमत नसल्याने भाजपाला तिहेरी तलाक विधेयक मंजूर करण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

Tripple Talaq Bill in Rajya Sabha today | तिहेरी तलाक विधेयक आज राज्यसभेत; मोदी सरकारची अग्निपरीक्षा 

तिहेरी तलाक विधेयक आज राज्यसभेत; मोदी सरकारची अग्निपरीक्षा 

Next

नवी दिल्ली - लोकसभेत तिहेरी तलाक विधेयक मंजूर झाल्यानंतर आज राज्यसभेत हे विधेयक मांडण्यात येणार आहे. विधेयक मंजूर करण्यासाठी भारतीय जनता पार्टीला अग्निपरीक्षा द्यावी लागणार आहे. भाजपा खासदारांना राज्यसभेत उपस्थित राहण्यासाठी व्हीप जारी करण्यात आला आहे. राज्यसभेत तिहेरी तलाक विधेयक मंजूर करण्यासाठी मोदी सरकारला एनडीएचे घटकपक्ष आणि अन्य इतर पक्षांवर अवलंबून राहावं लागणार आहे. 

राज्यसभेत बहुमत नसल्याने भाजपाला तिहेरी तलाक विधेयक मंजूर करण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. लोकसभेत बहुमत असल्याने हे विधेयक सहजरित्या मंजूर करण्यात भाजपाला यश आलं मात्र राज्यसभेत हे विधेयक मंजूर करण्यासाठी भाजपाला अग्निपरीक्षा द्यावी लागणार आहे. राज्यसभेत एनडीएकडे बहुमत नाही. माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांची तब्येत खराब असल्याने ते मतदान करण्यासाठी हजर नसतील. अशात भाजपाकडे 77 खासदार तर एनडीएची संख्या 103 पर्यंत मर्यादीत आहे. 

केंद्र सरकारमधील भाजपाचा सहकारी पक्ष नितीशकुमार यांचा पक्ष जनता तिहेरी तलाक विधेयकावर मतदान करणार नाही. एआयएडीएमके, वायएसआर काँग्रेसदेखील मतदानाचा सहभागी होणार नाही. तर बीजू जनता दल तिहेरी तलाक विधेयकावर सरकारच्या बाजूने मतदान करेल. 

राज्यसभेत हे विधेयक पास करण्यासाठी 121 मतांची गरज आहे. राज्यसभेत वायएसआर काँग्रेसकडे 2, जेडीयू 6 आणि एआयएडीएमके यांच्याकडे 13 खासदारांचे संख्याबळ आहे. मात्र हे तिन्ही पक्ष विधेयकावर मतदान करणार नाहीत. तर तेलंगणा राष्ट्र समिती या मतदानात सहभागी होणार का यावर स्पष्टता नाही. टीआरएसचे 6 खासदार आहेत. 

विधेयकाच्या समर्थनार्थ होणारं संभाव्य मतदान 
भाजपा - 78
असम गण परिषद - 1
नगा पीपल्स फ्रंट - 1 
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया - 1
सिक्किम डेमोक्रेटिक फ्रंट- 1
शिवसेना- 3
लोक जनशक्ती पार्टी- 1
अपक्ष - 4
बीजू जनता दल - 7 
नामनिर्देशित सदस्य - 3
एकूण संख्याबळ - 108 
 

विधेयकाच्या विरोधात मतदान करणारे 
काँग्रेस - 48 
तृणमूल कांग्रेस- 13
आम आदमी पार्टी- 3
बहुजन समाज पार्टी- 4
समाजवादी पार्टी- 12
द्रविण मुनेत्र कड़गम- 3
जनता दल(सेक्युलर)- 1
राष्ट्रीय जनता दल- 5
राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी- 4
भारतीय कम्युनिस्ट पार्टी- 2
भारतीय कम्युनिस्ट पार्टी मार्क्सवादी- 5
इंडियन यूनियन मुस्लिम लीग- 1
केरळ मणि कांग्रेस -1
पीपल्स डेमोक्रेटिक पार्टी- 2
तेलगू देशम पार्टी- 2
अपक्ष- 2
नामनिर्देशित सदस्य- 1

एकूण संख्याबळ - 109 
 

जर अशा परिस्थिती कोणताही सदस्य गैरहजर राहिला अथवा कोणत्या पक्षाने सभात्याग केला तर त्याचा फायदा एनडीएला होऊ शकतो. जर तसं झालं तर तिहेरी तलाक विधेयक राज्यसभेत मंजूर होण्यास कोणतीही अडचण नाही. 

Web Title: Tripple Talaq Bill in Rajya Sabha today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.