शहरं
Join us  
Trending Stories
1
Sachin Pilot : "काँग्रेसला भाजपापेक्षा जास्त जागा मिळतील; जे खूप वर जातात ते एक ना एक दिवस खाली येतात"
2
'दक्षिणेतील लोकं आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
3
Ajit Pawar : श्रीनिवास पवारांनी मला साथ देणार असल्याचं सांगितलं होतं, पण....' अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
4
टोल नाकेवाल्यांनी पैसे घेतले, NHAI ला महागात पडले; परदेशी वाहनमालक नडला, 25000 चा दंड
5
केरळमध्ये वेस्ट नाईल तापाचा प्रादुर्भाव; 'या' धोकादायक आजाराची लक्षणे काय आहेत? जाणून घ्या...
6
Smriti Irani Tax Saving Funds : स्मृती इराणींनी ज्या टॅक्स सेव्हिंग फंडात गुंतवणूक केली, माहितीये त्यांची कामगिरी कशीये?
7
शाहीद-करीना नाही तर 'या' जोडीला ऑफर झाला होता 'जब वी मेट', इम्तियाज अलीचा खुलासा
8
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
9
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
10
अक्षय्य तृतीयेला पंचमहायोग: लक्ष्मीकृपा मिळण्यासाठी ‘हे’ उपाय करा, लाभ मिळवा; शुभच होईल!
11
‘अदानी, अंबानींकडून किती माल उचलला, त्यांना शिव्या देणं अचानक कसं काय बंद केलं?’, मोदींचा काँग्रेसला सवाल  
12
शरद पवारांनी दिलेला 'तो' प्रस्ताव काँग्रेसनं फेटाळला होता; संजय निरुपमांचा दावा
13
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार का? संजय राऊतांचा सवाल
14
ना विराट, ना रोहित! पॅट कमिन्सचा आवडता भारतीय खेळाडू कोण? त्याचं धक्कादायक उत्तर
15
'भाजपमुळे मस्ती वाढली'; मराठी गुजराती वादावार आदित्य ठाकरेंचा संताप
16
Akshaya Tritiya 2024 ला सोनं खरेदी करणार असाल तर मोबाइलमध्ये ठेवा 'हे' App; फसवणूक होणार नाही
17
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
18
मुस्लिमांना कुठे, किती अन् कसं मिळते आरक्षण; भारतीय संविधानात काय म्हटलंय? जाणून घ्या
19
गुरु-शुक्र अस्तंगत: अडीच महिने विवाह मुहूर्त नाही? जुलैनंतर थेट नोव्हेंबरमध्ये सनई चौघडे
20
वडिलांच्या गैरहजेरीत अनेकदा नातेवाईकांनी दिला होता सनीला चोप; म्हणाला, 'रक्त येईपर्यंत मी...'

तिहेरी तलाक देणाऱ्या पतीला जामीन मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2018 3:58 PM

विधेयकामध्ये सुचविलेल्या बदलांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

नवी दिल्ली : मुस्लिम पतीने पत्नीला तिहेरी तलाक देणे हा फौजदारी गुन्हा ठरविणाऱ्या प्रस्तावित कायद्याच्या विधेयकात तीन प्रमुख दुरुस्त्या करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने गुरुवारी मंजूरी दिली. मूळ विधेयक आधी लोकसभेत मंजूर झाले असले तरी आता या सुधारणांसह ते पुन्हा मंजूर करून घ्यावे लागेल. राज्यसभेत हे विधेयक अद्याप मंजूर व्हायचे आहे.मंत्रिमंडळ बैठकीनंतर केंद्रीय विधी व न्यायमंत्री रविशंकर प्रसाद यांनी सांगितले की, मूळ विधेयकात तीन प्रमुख दुरुस्त्या प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. त्यापैकी एका दुरुस्तीनुसार तिहेरी तलाक देणे हा गुन्हा अजामिनपात्र म्हणूनच कायम ठेवला असला तरी योग्य प्रकरणांत दंडाधिकारी आरोपीस जामीन देऊ शकतील. पती व पत्नी यांच्यात समेट झाला तर दंडाधिकारी सुयोग्य अटींवर प्रकरण बंदही करू शकतील.कायदामंत्री म्हणाले की, आणखी एक दुरुस्ती अशी आहे की, फक्त पत्नीने किंवा तिचे जिच्याशी लग्नाने नाते लागते अशा दुसºया व्यक्तीने फिर्याद नोंदविली तरच या गुन्ह्याची पोलीस दखल घेऊ शकतील. अल्पवयीन मुलांचा ताबा व स्वत:साठी आणि मुलांसाठी खावटी मागणारे अर्ज बाधीत पत्नी दंडाधिका-यांकडे करू शकेल, अशीही सुधारणा करण्यात येणार आहे.>त्यामुळे केल्या दुरुस्त्यासर्वोच्च न्यायालायने गेल्या वर्षी तिहेरी तलाक घटनाबाह्य असल्याचा ऐतिहासिक निकाल दिल्यानंतर सरकारने हा कायदा करण्याची लगेच तयारी सुरु केली होती. आधी तयार केलेल्या विधेयकावर टीका झाली होती. ती विचारात घेऊन आता या दुरुस्त्या करण्यात येतील.

टॅग्स :triple talaqतिहेरी तलाकCentral Governmentकेंद्र सरकारLoksabhaलोकसभा