शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
9
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
10
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
11
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
12
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
13
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
14
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
15
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
16
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
17
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
18
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
19
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
20
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार

तिहेरी तलाकविरोधी विधेयक लांबणीवरच, वटहुकुमाची शक्यता नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2018 4:03 AM

संसद अधिवेशनात तिहेरी तलाकविरोधी विधेयक राज्यसभेत शुक्रवारी मंजूर करून घेण्यात केंद्राला अपयश आले असून, ते आता २९ जानेवारीपासून सुरू होणाºया अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडण्यात येईल. मात्र वटहुकूम काढण्याचा केंद्राचा विचार नाही. या विधेयकातील काही तरतुदींबाबत विरोधी पक्ष व तेलुगु देसमने आक्षेप घेत ते चिकित्सा समितीकडे पाठवण्याची मागणी केली.

- हरिश गुप्तानवी दिल्ली -  संसद अधिवेशनात तिहेरी तलाकविरोधी विधेयक राज्यसभेत शुक्रवारी मंजूर करून घेण्यात केंद्राला अपयश आले असून, ते आता २९ जानेवारीपासून सुरू होणाºया अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडण्यात येईल. मात्र वटहुकूम काढण्याचा केंद्राचा विचार नाही.या विधेयकातील काही तरतुदींबाबत विरोधी पक्ष व तेलुगु देसमने आक्षेप घेत ते चिकित्सा समितीकडे पाठवण्याची मागणी केली. त्यामुळे विधेयकातील तरतुदींबाबत एकमत घडवून आणण्यासाठी सर्वच पक्षांशी चर्चा करण्याचा विचार केंद्र सरकार करीत आहे. हे विधेयक हिवाळी अधिवेशनात आले तरी ते चिकित्सा समितीकडे विचारासाठी पाठवावे, यासाठी काँग्रेससह सर्वच विरोधक आग्रह धरणार आहेत. मात्र विधेयके चिकित्सा समितीकडे जाऊ नयेत, असा हल्ली केंद्राचा प्रयत्न असतो. या कायद्याच्या अमलबजावणीसाठी वटहुकूम काढण्याची शक्यता नाही असे सांगून एका वरिष्ठ मंत्र्याने सांगितले की, लोकसभेने ते मंजूर केले आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात ते राज्यसभेत मंजूर करून घेण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करू.अर्थविधेयकात रूपांतर?अरुण जेटली यांनी ‘लोकमत'ला सांगितले की, पतीने केलेल्या अन्यायाविरोधात लढू पाहाणाºया मुस्लीम महिलांना केंद्र सरकारने आर्थिक मदत द्यावी, अशी सूचना विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी केली आहे. ही सूचना विचाराधीन आहे. ती स्वीकारली गेली तर विधेयक अर्थविषयक होईल आणि अर्थविधेयक मंजूर न करता लोंबकळत ठेवण्याचा अधिकार राज्यसभेला नाही.पोलिसांच्या अधिकारांविषयी आक्षेपपतीविरोधात पत्नी किंवा तिचे जवळचे नातेवाईक तक्रारदार हवेत, अशी तेलुगु देसमची मागणी आहे.सध्याच्या तरतुदींमध्ये पोलिसांना खूपच अधिकार असून ते त्याचा गैरवापर करण्याची भीतीही या पक्षाला वाटते. विविध पक्षांनी तिहेरी तलाकविरोधी विधेयकामध्ये ज्या दुरुस्त्या सुचविलेल्या आहेत, त्यांचा गांभीर्याने विचार करण्याची केंद्राची तयारी आहे.

टॅग्स :triple talaqतिहेरी तलाकPuneपुणेIndiaभारत