शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
2
आजचे राशीभविष्य - १ मे २०२४; आर्थिक लाभ संभवतात अन् नशिबाची साथ लाभेल
3
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
4
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
5
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
6
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
7
वर्षा गायकवाड यांच्या रॅलीला उद्धवसेनेचे पाठबळ, नसीम खान, भाई जगताप नाराज?
8
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
9
वैशाली दरेकर यांच्या मालमत्तेत २३ लाखांची वाढ; कर्ज नाही, स्वतःचे वाहन नाही
10
किळस अन् कलंक; विद्यमान खासदाराचे वासनाकांड चव्हाट्यावर आल्याने देश नखशिखांत हादरला
11
पीयूष गोयल यांच्या संपत्तीत २ वर्षांत १०.६१ कोटींची भर;एकही गुन्हा दाखल नाही
12
यूपीत 'एमडी'चा कारखाना उद्ध्वस्त, सहा जणांना ठोकल्या बेड्या; ठाणे पोलिसांनी जप्त केला २० कोटींचा मुद्देमाल
13
बलात्कारानंतर जन्मलेल्या बाळाची केली विक्री; मुलीच्या आई-वडिलांसह १६ जणांवर गुन्हा
14
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
15
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
16
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
17
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
18
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
19
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
20
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती

‘ट्रिपल तलाक’ विधेयक आज राज्यसभेत मांडणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2018 5:50 AM

‘ट्रिपल तलाक’ विधेयक सोमवारी राज्यसभेत मांडण्यात येणार आहे, तर हे विधेयक सद्य:स्थितीत मंजूर होऊ देणार नाही, असे काँग्रेसने स्पष्ट केले आहे.

नवी दिल्ली : ‘ट्रिपल तलाक’ विधेयक सोमवारी राज्यसभेत मांडण्यात येणार आहे, तर हे विधेयक सद्य:स्थितीत मंजूर होऊ देणार नाही, असे काँग्रेसने स्पष्ट केले आहे. सत्तारूढ भाजपाने वरिष्ठ सभागृहात व्हिप जारी करून आपल्या सदस्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.कायदामंत्री रविशंकर प्रसाद राज्यसभेत हे विधेयक सादर करणार आहेत. या विधेयकाला गुरुवारी लोकसभेत मंजुरी मिळाली आहे. विरोधकांनी सभात्याग केल्यानंतर या विधेयकाच्या बाजूने २४५, तर विरोधात ११ मते पडली होती.रविशंकर प्रसाद यांनी शुक्रवारीच असा दावा केला आहे की, भलेही राज्यसभेत भाजपाकडे पर्याप्त संख्याबळ नसेल; पण सभागृहात या विधेयकाला समर्थन मिळेल. अ.भा. काँग्रेस समितीचे महासचिव के.सी. वेणुगोपाल यांनी शनिवारी कोचीमध्ये पत्रकारांशी बोलताना सांगितले की, समविचारी पक्षांना बरोबर घेऊन हे विधेयक मंजूर होऊ देणार नाही. १० विरोधी पक्ष लोकसभेत या विधेयकाविरुद्ध समोर आले होते, असेही ते म्हणाले. तथापि, अण्णाद्रमुकसह जे पक्ष विविध मुद्यांवर सरकारचे समर्थन करीत होते त्यांनीही या विधेयकाला विरोध केल्याचे वेणुगोपाल यांनी सांगितले. विरोधकांनी ट्रिपल तलाकच्या तरतुदीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या विधेयकावर आणखी विचार करण्यासाठी ते संसदेच्या संयुक्त निवड समितीकडे पाठविण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. (वृत्तसंस्था)...तर कुटुंबे बर्बाद होतीलट्रिपल तलाक विधेयकाचे जर कायद्यात रूपांतर झाले, तर अनेक कुटुंबे बर्बाद होतील, अशी भीती आॅल इंडिया मुस्लिम वुमेन पर्सनल लॉ बोर्डाने (एआयएमडब्ल्यूपीएलबी) व्यक्त केली आहे. पर्सनल लॉ बोर्डाने म्हटले आहे की, मतैक्यासाठी काही संधी ठेवण्याची गरज होती.जेव्हा सर्व पर्याय समाप्त होतात तेव्हाच तलाक होतो. लॉ बोर्डाच्या अध्यक्षा शाइस्ता अंबर यांनी म्हटले आहे की, नव्या विधेयकात दिलासा मिळण्याऐवजी शिक्षाच होत असेल, तर आम्ही याविरुद्ध आंदोलन करू.

टॅग्स :triple talaqतिहेरी तलाक