शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 1 मे रोजी अयोध्या दौऱ्यावर, रामललांचं दंर्शन, हनुमानगढी मंदिरात आरती अन्...; असा असेल संपूर्ण कार्यक्रम!
2
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
3
KL Rahul च्या नेतृत्वासमोर मुंबई इंडियन्स ढेपाळले; रोहित ४, तर हार्दिक गोल्डन डकवर आऊट 
4
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
5
'नरेंद्र मोदी मोठ्या मनाचा नेता, एक मेसेज पाठवला अन् काम झालं', काँग्रेसच्या माजी नेत्यानं सांगितला किस्सा
6
“भटकती आत्मा तर नरेंद्र मोदीच, प्रधानमंत्री कमी अन् प्रचारमंत्रीच जास्त”; नाना पटोलेंची टीका
7
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
8
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
9
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
10
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर पण बाळासह आईचा मृत्यू
11
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
12
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
13
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
14
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
15
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
16
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
17
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
18
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
19
सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा
20
किंग खानच्या KKR मधील प्रमुख खेळाडूवर एका सामन्याची बंदी; DC विरुद्धची चूक भोवली

पश्चिम बंगाल लोकसभा निवडणूक निकाल 2019 : तृणमूलची आघाडी कायम; भाजपच्याही जागा वाढल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2019 4:59 AM

यंदाच्या लोकसभा निवडणुकांत पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसचा गड उद्ध्वस्त करण्याच्या इर्षेने भाजप त्या राज्यामध्ये प्रचार करत होता.

- समीर परांजपेयंदाच्या लोकसभा निवडणुकांत पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसचा गड उद््ध्वस्त करण्याच्या इर्षेने भाजप त्या राज्यामध्ये प्रचार करत होता. तर आपला बालेकिल्ला सुरक्षित राहावा म्हणून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपविरोधात पूर्वीपेक्षा आक्रमक पवित्रा घेतला. या संघर्षाचे प्रतिबिंब निकालात पाहायला मिळत असून, पश्चिम बंगालमधील ४२ लोकसभा जागांपैकी तृणमूल काँग्रेस २३, भाजप १८ जागांवर तर काँग्रेस फक्त एका जागेवर आघाडीवर आहे.पश्चिम बंगालमध्ये अनेक वर्षे सत्तेवर असलेल्या डाव्यांची मक्तेदारी ममता बॅनर्जी यांनी संपुष्टात आणली होती. आक्रमक नेतृत्वशैली असलेल्या ममतांनी दाखविलेल्या विकासाच्या स्वप्नांची बंगाली माणसाला भुरळ पडली. मात्र, ममता बॅनर्जी यांच्या राजवटीत राज्याची अपेक्षित प्रगती होत नसल्याने तेथील सामान्य माणसे दुसऱ्या सशक्त पर्यायाच्या शोधात होती. पश्चिम बंगालमध्ये डाव्यांचे नाममात्र अस्तित्व उरले आहे. त्यामुळे निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी भाजप पुढे सरसावला.या राज्यात पाय रोवण्यासाठी तृणमूल काँग्रेसशी संघर्ष करणे अपरिहार्य होते. एके काळी एनडीएचा घटक पक्ष असलेला तृणमूल काँग्रेस नंतर राजकीय मतभेदांमुळे या आघाडीपासून दूर गेला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारभारावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी अतिशय नाराज आहेत. पश्चिम बंगालमध्ये शारदा व अन्य चीट फंडांचा काही हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला. त्यामध्ये तृणमूल काँग्रेसच्या काही नेत्यांचा हात असल्याचा भाजपचा आरोप असून, या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे आहे. कोलकाताचे तत्कालीन पोलीस आयुक्त राजीवकुमार यांची चौकशी करण्यासाठी आलेल्या सीबीआय पथकालाच जेरबंद करण्याची अभूतपूर्व कृती ममता बॅनर्जी सरकारने केली. लोकसभा निवडणुकांत भाजपचा मुकाबला करण्यासाठी विरोधी पक्षांची आघाडी स्थापन करण्यासाठी ममतांनी पुढाकार घेतला होता. ममता बॅनर्जी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचारात एकमेकांवर वैय क्तिक स्वरूपाची टीका केली. फोनी वादळासंदर्भात बंगालमधील स्थिती जाणून घेण्यासाठी मोदींनी केलेला फोनही ममतांनी घेतला नाही. मोदींची कार्यशैली, त्यांनी न पाळलेली आश्वासने यांच्यावर ममतांनी कोरडे ओढले होते. तर ममता बॅनर्जी पश्चिम बंगालच्या विकासातील स्पीड ब्रेकर आहेत असा प्रहार मोदी भाषणांतून करत होते.कोलकातात भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या रोड शोच्या वेळी तृणमूल काँग्रेस व भाजप कार्यकर्त्यांत हाणामारीही झाली. समाजसुधारक ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यापर्यंत काही जणांची मजल गेली. या गोष्टींमुळे पश्चिम बंगालमधील वातावरण ढवळून निघाले होते. लोकसभा निवडणुकांत भाजपने राज्यात मुसंडी मारली असून, तृणमूल काँग्रेसला त्याचा काही प्रमाणात फटका बसला आहे. डाव्या पक्षांची मतेही भाजपकडे वळल्याचेही राजकीय निरीक्षकांचे मत आहे. या राज्यात २०२१ साली विधानसभा निवडणुका असून त्यात ममता बॅनर्जी यांना पराभूत करण्याचे लक्ष्य भाजपने ठेवले आहे.

>निकालाची कारणेममता बॅनर्जी यांच्या राजवटीत पश्चिम बंगालचा विकास विकास होत नसल्याचा भाजपचा प्रचार सामान्य मतदारांना पटू लागला होता.त्रिपुरानंतर पश्चिम बंगालमधील सत्ता काबीज करणे हे उद्दिष्ट भाजपने मनाशी धरले आहे. त्यामुळे तृणमूल काँग्रेसविरोधात भाजपने पद्धतशीरपणे रान पेटविले.डावे, काँग्रेस हे या राज्यात क्षीण असल्याने तृणमूल व भाजपमध्येच खरी लढत झाली.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीWest Bengal Lok Sabha Election 2019पश्चिम बंगाल लोकसभा निवडणूक 2019